अमरावती : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण प्रवेशसंदर्भातील अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे आयटीआयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहे. तसेच अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. प्रवेशाची पहिली यादी ६ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज दाखल केले आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश अर्ज नोंदणीसाठी १५ जुलैपासून प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी बऱ्याच प्रमाणात नोंदणी केली. त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी फी भरून अर्ज कन्फर्म केले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. काही वर्षात विद्यार्थ्यांचा इतर शाखाबरोबर आयटीआयकडेही कल वाढला आहे. मुले-मुली चांगल्या करिअरच्या दृष्टिकोनातून आयटीआयकडे वळत आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत असल्याने अर्जाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
असे आहे वेळापत्रक
पहिल्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय व प्राधान्य सादर करणे
२ सप्टेंबर प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी, हरकती तसेच प्रवेश अर्जातील माहितीमध्ये बदल
४ सप्टेंबर संकेतस्थळावर अंतिम यादी प्रसिद्ध होण्याची तारीख व वेळ रोजी सायंकाळी ५ वाजता
६ सप्टेंबरला पहिली प्रवेश फेरी