अमरावती : अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली असून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आता प्रवेशाची लगबग आहे. ५ हजार ५४३ विद्यार्थ्यांची पहिली यादी २७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शहरात ऑनलाईन तर ग्रामीण भागात ऑफलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार शहरी भागात सर्व शाखांच्या १५८३० जागा असून ८ हजार १५८ जणांचे प्रवेशासाठीचे अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले. त्यापैकी पहिल्या राऊंडसाठी ५ हजार ५३४ विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना ३० ऑगस्टपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे. अकरावी प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्याना संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा १४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. त्यानुसार शहरासाठी ८१५८ विद्यार्थ्याचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याच दिवसापासून अकरावी प्रवेशाला सुरुवात करण्यात आली. यात कला शाखेसाठी १०६५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. वाणिज्य शाखेसाठी ८२१ आणि विज्ञान शाखेसाठी ३४६७ विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. व्यावसायिक अभ्यासक्रम एमसीव्हीसीसाठी १८१ जणांची यादी प्रसिद्ध झाली आहे. विद्यार्थ्यांना ३० ऑगस्टपर्यंत प्रवेश संबंधित महाविद्यालयात घ्यावा लागणार आहे तसेच पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर दुसऱ्या राऊंडचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याची माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समन्वयक अरविंद मंगळे यांनी सांगितले.
बॉक्स
बॉक्स
शाखानिहाय जागा
एकूण कनिष्ठ महाविद्यालय ६५
शाखा उपलब्ध जागा
कला ३४६०
वाणिज्य २६६०
विज्ञान ६९४०
एमसीव्हीसी २९३०
एकूण १५९९०