शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

सुपर रुग्णालयात  पहिली न्यूरो सर्जरी यशस्वी; महिलेला मिळाले जीवनदान

By उज्वल भालेकर | Published: April 26, 2023 7:32 PM

हा वर्षांपासून डोक्याला होती गाठ

अमरावती : शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे पहिली न्यूरो सर्जरी (मेंदूची शस्त्रक्रिया) यशस्वी झाली असून, ३० वर्षीय महिलेला जीवनदान मिळाले आहे. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी १५ सेंटिमीटर लांब तर तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम वजनी गाठ काढली. मागील दहा वर्षांपासून या महिलेच्या डोक्यामध्ये ही गाठ होती.

शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय हे जिल्ह्यासह अमरावती विभागातील विविध रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. या ठिकाणी मंगळवार दि. २५ एप्रिल रोजी पहिली न्यूरो सर्जरी करण्यात आली. जिल्ह्यातील मोगरा येथील ३० वर्षीय महिलेच्या डोक्याला तब्बल दहा वर्षांपासून गाठ होती. ही गाठ दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे सदर महिलेने अनेक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले; परंतु तिला आराम मिळाला नाही. अखेर गाठीच्या वाढत्या त्रासामुळे ती ११ एप्रिल रोजी सुपरमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. यावेळी येथील न्यूरो सर्जनने तपासणीनंतर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्याचा निर्णय घेतला. तब्बल तीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम वजन असलेली गाठ काढली असून, ही गाठ लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवली आहे. ही शस्त्रक्रिया महात्मा जोतिबी फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नि:शुल्क केल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

या डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

न्यूरो सर्जरी ही सुपरचे वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरो सर्जन डॉ. स्वरूप गांधी, डॉ. अभिजित बेले, डॉ. योगेश सावदेकर, डॉ. तक्षक देशमुख (प्लास्टिक सर्जन), बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. रवी भूषण, डॉ. अभिजित दिवेकर, डॉ. नीलेश पाचबुधे, डॉ. अंजू दामोदर यांनी यशस्वी केली. त्याचबरोबर अधिसेविका चंदा खोडके, परिचारिका दीपाली देशमुख, संध्या काळे, तेजल बोडगे, सरला राऊत, सुजाता इंगळे, भारती घुसे, प्राजक्ता देशमुख, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमधील डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यानी मुंदाने, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे, औषध विभागाचे हेमंत बनसोड, संतोष शिंदे याचेही विशेष सहकार्य लाभले आहे.सदर महिला ही ११ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. दहा वर्षांपासून तिच्या डोक्यावर गाठ होती. त्यामुळे तपासणीनंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील ही पहिलीच न्यूरो सर्जरी होती. जवळपास तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमची ही गाठ आहे. ही गाठ पुढील तपासणीसाठी लॅबला पाठविली आहे. -डॉ. मगेश मेंढे, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Amravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल