लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये तालुक्यातील जामठी गावाला तालुकास्तरावरचे पहिले पारितोषिक मिळाले आहे. रविवारी बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या कार्यक्रमात सिनेअभिनेते तथा पानी फाउंडेशनचे अमीर खान यांनी जामठी गावाला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित केले .जामठी गावाला पानी फाउंडेशनकडून १० लाख रुपये, तर मुख्यमंत्री निधीतून सहा लाख रुपये पुरस्कारस्वरूपात मिळाले आहेत. द्वितीय बक्षीस मिळविणाऱ्या माणिकपूर गावाला मुख्यमंत्री निधीतून सहा लाख रुपये तसेच तृतीय बक्षीस मिळविणाºया उदापूर गावाला मुख्यमंत्री निधीतून चार लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.वरूड तालुक्यातून जामठी, माणिकपूर व उदापूर गावांनी वॉटर कप स्पर्धेत बाजी मारल्याने तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. जामठी येथील अलकेश काळभोर व इंदर गाडगे यांनी गावकऱ्यांच्यावतीने पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाला जामठी, माणिकपूर, उदापूर, पिंपळखुटा, गव्हाणकुंड, सावंगा, खानापूर, पुसला येथील ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. पुरस्काराने हुरूप आला असून, आणखी जोमाने काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जामठीला १० लाखांचे प्रथम बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 1:26 AM
पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये तालुक्यातील जामठी गावाला तालुकास्तरावरचे पहिले पारितोषिक मिळाले आहे. रविवारी बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या कार्यक्रमात सिनेअभिनेते तथा पानी फाउंडेशनचे अमीर खान यांनी जामठी गावाला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित केले .
ठळक मुद्देवरुड तालुका : वॉटर कप स्पर्धेत तीन गावांना मिळाले पुरस्कार