पान १
पळसखेड मार्गावर पाणीच पाणी; चारचाकी पलटली
फोटो पी १० पळसखेड
चांदूर रेल्वे : गुरुवारी मान्सूनने तालुक्यात धडाक्यात एन्ट्री केली. पहिल्याच पावसात शहराचा ग्रामीण संपर्क तुटला. शहरातून पळसखेड मार्गे जाणाऱ्या रेल्वे अंडरब्रिजमध्ये पाणी तुडुंब भरल्याने दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली होती.
शहरातून पळसखेडकडे रेल्वे अंडरब्रिजमार्गे जाणारा रस्ता आधीच अरुंद असून, त्याच्यासमोर वळण रस्त्यावरून जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्ता बंद झाला होता. एवढेच नाही तर रेल्वे फाटक बंद असल्याने या पुलाखालून वाहने काढण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचा अंदाज चुकल्याने थेट नाल्यात कोसळले.
वर्धा मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने याच पुलाखालून एसटी बस जातात. त्यामुळे वर्धा पुलगावकडे जाणाऱ्या बसेसला फेऱ्याने जावे लागत आहे. शहरात दुपारी १२ वाजता पावसाला सुुवात झाली. मुसळधार पाऊस तीन तास बरसला. त्यामुळे अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे पुढील पावसापासून बचाव करण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी ताडपत्री घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.
===Photopath===
100621\1814-img-20210610-wa0020.jpg
===Caption===
photo