शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
2
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
4
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
5
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
6
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
7
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
8
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
9
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
10
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
11
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
12
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
13
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
14
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
15
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
16
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
17
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
18
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
19
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
20
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा

अमरावतीतील पोहरा-मालखेड जंगलात रानगवाची पहिली नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:29 IST

Amravati : जंगलात विविध प्रजातीचे पक्षी, वन्यप्राणी आढळून येणे ही बाब आनंददायी ठरणारी

अमोल कोहळे / अमरावती

पोहरा बंदी (अमरावती) : पोहरा-मालखेड राखीव जंगल हे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पानंतर सर्वांत मोठे जंगल. या जंगलामध्ये वाघ, बिबट, जंगली कुत्रा, तडस, लांडगे, हरीण, निलगाय असे प्राण्यांची नियमित अस्तित्व असते, पण रानगवा पहिल्यांदाच आढळला आहे. हे समृद्ध जंगलाचे लक्षण मानले जात आहे.

युथ फॉर नेचर कॉन्झर्व्हेशन ही संस्था बिबट, वाघ यासारख्या प्राण्यांवर अमरावती वनविभाग सोबत संशोधन करत आहे. ज्यामध्ये ट्रॅप कॅमेऱ्याच्या मदतीने वन्यप्राण्यांच्या हालचालीवर लक्ष्य ठेवण्यात येते. या दरम्यान अमरावती लगत असणाऱ्या वन क्षेत्रात विशिष्ट प्रकारचे खुराचे निशाण आढळले व ते रान गव्याचे असल्याची शंका असल्याने तीथे ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी त्या कॅमेरात रानगव्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात आले आहे. पोहरा -मालखेड या जंगलामध्ये अशा प्रकारची ही प्रथम नोंद असल्याचे संस्थेचे अध्यक्ष व वन्यजीव अभ्यासक डॉ स्वप्नील सोनोने यांनी सांगितले. या समृद्ध जंगलात विविध प्रजातीचे पक्षी, वन्यप्राणी आढळून येणे ही बाब आनंददायी ठरणारी आहे. अमरावती प्रादेशिकच्या वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, भानुदास पवार यासह वनविभागाचे कर्मचारी व युथ फॉर नेचर कॉन्झर्व्हेशनची टीम या प्राण्याच्या संवर्धनासाठी सोबत काम करत आहे.

"अमरावती प्रादेशिक वन विभागांतर्गत येणारे हे जंगल १०० चौ किमी पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये पसरलेले असून येथे २७५ पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद आहे. यामध्ये स्थानिक व स्थलांतर करुन येणाऱ्या पक्ष्यांचा समावेश आहे, तसेच विविध फुलपाखराच्या व कीटकांच्या प्रजातीची नोंद आहे. रानगव्याचा अस्तित्वाने या जंगलाची समृद्धी अधोरेखित होते."- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक अमरावती

"रानगवा हा गोवंश कुलातील सगळ्यात मोठा प्राणी आहे व हा शाकाहारी असुन त्यांच्या सध्याच्या जगातील लोकसंख्येपैकी ८५  टक्के भारतात आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत शेड्यूल एक प्रजाती म्हणून सूचिबद्ध आहेत आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड लिस्टमध्ये ‘असुरक्षित’ म्हणून घोषित केले आहेत."-डॉ. स्वप्नील सोनोने, वन्यजीव अभ्यासक

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAmravatiअमरावती