अमोल नवलकार लेहेगाव रेल्वेयंदा संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. मात्र, या विपरित परिस्थितीत सुखावह बाब म्हणजे यंदा पावसाळा लांबल्याने व संपूर्ण हिवाळ्यात कोसळलेल्या अवकाळी पावसाने कपाशीला मात्र चांगले दिवस आले आहेत. १० वर्षांत पहिल्यांदाच कपाशी ‘फुलपाते’ म्हणजे फुले आणि पानांनी बहरली असून त्यामुळे शेतकऱ्यांना ‘फरदडी’चा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. परिसरातील जाणकार शेतकऱ्यांच्या मते गेल्या अनेक वर्षानंतर असा योग आला आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे यंदा झालेले नुकसान आजवर कधीही झालेले नाही. कपाशीला सद्यस्थितीत उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी भाव असला तरी शेतकऱ्यांच्या आशा मावळलेल्या नाहीत. लेहेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कपाशीचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी कपाशीची पेरणी उशिरा झाली. परंतु अवकाळी पावसाची हजेरी आता कपाशीसाठी वरदान ठरत आहे. कपाशीला सध्या पाच ते सहा बोंडे असून फूलपाते देखील टिकून आहे. त्यामुळे कपाशीचे हे उत्पादन एप्रिल महिन्यापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. इतर पिकांच्या तुलनेत कपाशीसाठी लागणारा खर्च अधिक असतो. हे आठ ते नऊ महिन्यांचे पीक आहे. परंतु आता हा हंगाम एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत टिकून राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट कमी होण्यास मदत होईल. कपाशीचा विशिष्ट हंगाम सोडून त्यानंतर येणाऱ्या उत्पादनाला ‘फरदडी’ असे म्हणतात. ही फरदडीच आता शेतकऱ्यांना दिलासा देईल. कठीण होत चालले आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्यात चाऱ्याच्या शोधार्थ पाळीव जनावरे मोकाट सोडून दिली जातात. त्यामुळे पीक कसे वाचवायचे, हा खरा प्रश्न आहे. यावर उपाययोजना व्हाव्यात. गेल्या अनेक वर्षापासून अशी परिस्थिती कधीही ओढवली नाही. परंतु आता कपाशीच्या उत्पादनाचा फायदा होणार नाही. कारण, गावातील मोकाट गुरांचा हैदोस व त्यामुळे होणारी पिकहानी हा चिंतेचा विषय ठरणार आहे. मनोहर पाटील कौलखेडेसधन कास्तकार, लेहेगाव रेल्वेया भागात कपाशीचे उत्पादन अधिक घेतले जाते. परंतु यावर्षी नैसर्गिक संकटामुळे पिकांची हानी झाली. कपाशीवर थोडी फार भिस्त आहे. परंतु मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्याकडे विशेष लक्ष दिले जाईल.रेखा महानकरसरपंच, लेहेगाव रेल्वे
दहा वर्षांत पहिल्यांदाच कपाशीला फुलपाते
By admin | Published: March 29, 2015 12:38 AM