शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

पाच वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 5:00 AM

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,७२० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्षांक देण्यात आले होते. त्यातुलनेत बँकांनी १,०६,१०४ शेतकऱ्यांना ९४४.८० कोटींचे वाटप मागील आठवड्यापर्यंत केले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांना ११७७.६० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्षांक होते. त्यातुलनेत आतापर्यंत ६१,१४८ शेतकºयांना ६२७.४१ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले. ही ५३ टक्केवारी आहे.

ठळक मुद्दे५५ टक्के प्रमाण : ऑक्टोबरपासून रबी कर्जवाटपाची प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाच वर्षांच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात सर्वाधिक ५५ टक्के पीक कर्जवाटप करण्यात आलेले आहे. यंदा जुलैअखेरपासून जिल्ह्यात ७५० कोटींची कर्जमाफी झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला. परिणामी कर्जवाटपाचा टक्का वाढला व अंतिम अहवाल येईपर्यंत यामध्ये पुन्हा दोन ते तीन टक्के वाढ होणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले.साधारणपणे एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान खरीप व ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत रबीचे पीककर्ज वाटप होत असते. जिल्ह्यात कर्जमाफीची प्रक्रिया मार्च महिन्यांपासून स्थगित केली होती.अमरावती जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने आयोगाने कर्जमाफीची प्रक्रिया थांबविली होती. त्यामुळे खरीप हंगामात जुलै अखेरपावेतो फक्त २३ टक्केच कर्जवाटप झाले होते. मात्र, त्यानंतर ७५० कोटींची कर्जमाफी झाल्याने दोन महिन्यात ३० ते ३२ टक्के कर्जवाटप झाले.यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,७२० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्षांक देण्यात आले होते. त्यातुलनेत बँकांनी १,०६,१०४ शेतकऱ्यांना ९४४.८० कोटींचे वाटप मागील आठवड्यापर्यंत केले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांना ११७७.६० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्षांक होते. त्यातुलनेत आतापर्यंत ६१,१४८ शेतकºयांना ६२७.४१ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले. ही ५३ टक्केवारी आहे.ग्रामीण बँकांना १४.४० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्षांक असताना प्रत्यक्षात १५.४७ कोटींचे वाटप केले, ही १०७ टक्केवारी आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेला ५२८ कोटींच्या वाटपाचे लक्ष्यांक असताना प्रत्यक्षात ४३,६६८ खातेदारांना ३०१.९२ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले ही ५७ टक्केवारी आहे. यंदा कर्जमाफीनंतर कर्जवाटपाचा टक्का गत दोन महिन्यात वाढला आहे.नियमित कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ केव्हा?जिल्ह्यातील ३५ ते ४० हजार शेतकरी हे बँकांचे नियमित कर्जदार आहे. यापूर्वी झालेल्या कर्जमाफीतही त्यांना लाभ मिळालेला नाही त्यामुळे यंदाच्या कर्जमाफीमध्ये त्यांना लाभ मिळणार असल्याचे शासनाद्वारा वारंवार सांगण्यात आले. या आशेपोटी बहुतांश नियमित कर्जदारांनी यंदा कर्जाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे हे सर्व शेतकरी थकबाकीदार झालेत व त्यांना कर्ज मिळू शकलेले नाही. कर्जमाफीमध्येही प्रोत्साहनपर लाभदेखील मिळालेला नाही. या सर्व नियमित खातेदारांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी होत आहे.बँकानिहाय कर्जवाटपाची स्थितीअलाहाबाद बँक ९.२१ कोटी, आंध्रा ८४ लाख, बँक ऑफ बडोदा २१.९७ कोटी, बँक ऑफ इंडिया १९.३५ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र १८५ कोटी, कॅनरा ५.१० कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १२१.१० कोटी, कार्पोरेशन १३ लाख, इंडियन बँक ८.२४, पंजाब नॅशनल ३ कोटी, युनियन बँक ३९.७५ कोटी, एसबीआय १६८.४१ कोटी, युको बँक ३.०२ कोटी, अ‍ॅक्सिस १० कोटी, आयडीबीआय १.९४ कोटी, एचडीएफसी १७.३९ कोटी, आयसीआयसीआय ३.८० कोटी, रत्नाकर २० लाख, विदर्भ कोकन बँक १५.४७ कोटी व जिल्हा बँकेद्वारा ३०१.९२ कोटींचे पीककर्जवाटप करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज