शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

धरणातील मासोळ्या पाण्याबरोबर पडल्या बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 1:18 AM

मुसळधार पावसामुळे अचलपूर तालुक्यातील सपन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पाची दारे उघडली गेली आहेत. नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या धरणाच्या पाण्यासोबत मासोळ्या धरणाबाहेर पडत आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । खेकड्यांची पिलावळ वाढली, नागरिकांची मासे पकडण्यासाठी तिन्ही धरणक्षेत्राकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मुसळधार पावसामुळे अचलपूर तालुक्यातील सपन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पाची दारे उघडली गेली आहेत. नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या धरणाच्या पाण्यासोबत मासोळ्या धरणाबाहेर पडत आहेत.नदीपात्रात आढळून येणाऱ्या या धरणातील मासोळ्या गावकऱ्यांसाठी पर्वणी ठरत आहेत. अधिक वजनाच्या मोठ्या मासोळ्या पकडण्यात अनेक जण गुंतले आहेत.शहानूर, चंद्रभागा आणि सपन धरणात मोठ्या प्रमाणात मासोळ्या आहेत. मत्स्यपालन सहकारी संस्था ठेका पद्धतीने या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात मासोळी उत्पादन घेतात. यात शहानूर आणि चंद्रभागा धरणावर उपलब्ध होणारी ताजी मासोळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. ताजी मासोळी विकत घेण्याकरिता दूरदुरून ग्राहक निर्धारीत वेळेत धरणावर बघायला मिळतात.शहानूर धरणातील मासोळीला अंजनगाव बाजारात, तर चंद्रभागा धरणातील मासोळीला परतवाडा बाजारात अधिक मागणी आहे. या दोन्ही धरणावरील जिवंत मासोळ्या लहान ट्रकमधून जिल्ह्याबाहेरही पाठविल्या जातात.सपन नदीपात्रात पाण्यासोबत वाहून आलेल्या मासोळ्या काहींच्या हाती लागल्या आहेत. हाती लागलेल्या माशांचे त्यांनी मोठ्या हौसेने छायाचित्रेही काढली आहेत.दरम्यान, धरणस्थळी व नदीपात्रात खेकड्यांची पिलावळ वाढली आहे. गढूळ पाणी वाहताच सुप्तावस्थेतील खेकडे बाहेर पडतात.मेळघाट, अचलपुरात २३०० मिमीचिखलदरा, धारणी व अचलपूर तालुक्यात पाऊस झाल्यानंतर तिन्ही प्रकल्प ओसांडून वाहू लागतात. १० आॅगस्टपर्यंत धारणी तालुक्यात ९०९.५ मिमी (१३४.६ टक्के), चिखलदरा तालुक्यात १०७३.५ मिमी (१२१.४ टक्के), तर अचलपूर तालुक्यात ५१५.३ मिमी (११९.१ टक्के) पावसाची नोंद झाली. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत धारणीत ७७.६, चिखलदरा ७०.३ व अचलपुरात ७३.९ टक्के पाऊस झाला.

टॅग्स :fishermanमच्छीमारDamधरण