लोकमत न्यूज नेटवर्कबेलोरा-चांदूर बाजार : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत खरवाडी गावानजीक स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ४६ किलो ३०० ग्रॅम गांजा पकडला. ५ लाख ५५ हजार ८४० रुपयांच्या या मुद्देमालासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गांजा तस्करांच्या पाळतीवर होते. १८ डिसेंबर रोजी संबंधित तस्करांच्या मोबाईल लोकेशनवरून खरवाडी येथे सापळा लावला. सकाळी ११ ते १२ च्या सुमारास दोन दुचाकींवरून नेण्यात येत असलेली ही गांजाची खेप पकडण्यात आली. ६० हजार रुपयांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.सूरज ऊर्फ सुरू अविनाश शेळके (४०), जावेद अली मिर आली (३०, दोन्ही रा. चांदूर बाजार), शेख वसीम शेख करीम (२७, रा. अमरावती), कृष्णा गोंड (२२), दीपक नेमाडे (३०, दोन्ही रा. कुहरा काकडा, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक अजय आकरे, नायक कॉन्स्टेबल सुनील महात्मा सैयद अजमत, योगेश सांभोरे, मंगेश लोखंडे, स्वप्निल तवर, रवींद्र बावणे कॉन्स्टेबल पंकज वानखडे, पंकज फाटे तसेच चांदूर बाजार ठाण्याचे निरीक्षक सुनील किनगे, हेडकॉन्स्टेबल वीरेंद्र अमृतकर यांनी ही कारवाई केली.
आंध्र प्रदेशातून तस्करीविशाखापट्टणम् (तामिळनाडू) व वारंगल (आंध्र प्रदेश) येथून गांजा येत असल्याचा पोलिसांचा कयास आहे. आरोपी व मुद्देमाल चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.