अमरावती : शहर पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणच्या वरली-मटका अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून वरली-मटक्याचे साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते.
वलगाव पोलिसांनी खारतळेगावातील वरली-मटका व्यवसायावर धाड टाकून वासुदेव दत्ताजी गाडे (५० रा. खारतळेगाव) याला ताब्यात घेतले. नागपुरी गेट पोलिसांनी गवळीपुर्यात धाड टाकून साबीर अली आमद अली (४३ रा. नुरनगर) व मोहम्मद जहीर अब्दुल सईद (५० रा. हबीबनगर) यांच्या ताब्यातून ८४० रुपयांचा मुद्देमला जप्त केला. फ्रेजरपुरा पोलिसांनी यशोदानगरातील वरली-मटक्यावर धाड टाकून नरेंद्र कमळाकर सावरकर (५६ रा. यशोदानगर) याच्याजवळून ७८० रुपयांचे साहित्य जप्त केले. तसेच फ्रेजरपुरा परिसरात धाड टाकून राजेंद्र सुरेश टेकाडे (४२ रा. गडगडेश्वर मंदीर ह.मु. फ्रेजरपुरा) याच्या ताब्यातून ३६५ रुपयांचे साहित्य जप्त केला.
बॉक्स
पत्यांचा जुगार खेळणारे पसार
बडनेरा पोलिसांनी मिलचाळ परिसरातील जुगारावर धाड टाकली असता, चार ते पाच इसम आपआपली वाहने सोडून पळाली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन दुचाकी जप्त केल्या असून, तीन ते चार इसमांविरुध्द जुगार ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला. पोलिसांनी घटनास्थळावरून दुचाकी, पत्ते, दोन रजीस्टर, एक लोखंडी पेटी व जुगाराचे पैसे जप्त केले.
00000000000000000000000000
चार अवैध दारू अड्ड्यावर धाडी
अमरावती : शहर पोलिसांनी बुधवारी विविध ठिकाणच्या अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून आरोपीजवळील अवैध दारूचा मुद्देमाल जप्त केला. बडनेरा पोलिसांनी पाचबंगला परिसरातून पुरुषोत्तम बाबाराव चवरे (४८ रा. पाचबंगला) याच्या ताब्यातून ५४०रुपयांची दारु जप्त केली. राजापेठ पोलिसांनी एका महिलेच्या ताब्यातून ९०० रुपयांची दारू जप्त केली. खोलापुरी गेट पोलिसांनी राजेश श्रीरामजी काळे (४८ रा. माळीपुरा) याच्या ताब्यातून ७८०रुपयांची दारु जप्त केली. तसेच एका महिलेच्या ताब्यातून ५ हजार ५६० रुपयांची दारु जप्त केली.
000000000000000000000
वाहतुकीस अडथळा केल्याने चाैघांविरुध्द गुन्हा
अमरावती : सार्वजनिक रस्त्यावर वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा केल्याने शहर पोलिसांनी बुधवारी चार जणांविरुध्द गुन्हा नोंदविला. बडनेरा पोलिसांचे पथक जयहिंद चौकात पेट्रोलिंग करीत असताना, मोहम्मद शाहरुख मोहम्मद आरीफ (२१ रा. गुलिस्तानगर) व शहजाद खान हबीब खान (३१ रा. अमनकॉलनी) यांची वाहने रस्त्यावर उभी दिसली. तसेच वलगाव पोलीस चांदूरबाजार फाट्यावरून जात असताना, शेख शरीफ शेख ईमान (५२) आणि पंकज धनराज मदने (२७ दोन्ही रा. वलगाव) यांची वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे आढळून आले होते.