( अन्नाविना पाच दिवस जगण्यासाठी केलेला संघर्ष)
फोटो -
दर्यापूर : सामदा ते सांगळूद दरम्यान असलेल्या धरणातील मध्यभागी चिंचेच्या झाडावर अडकून अडकून पडले होते. त्यांची पाच दिवसांनंतर सुटका करण्यात आली.
तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे गयाटी नाल्यावरील धरणातील मध्यभागी चिंचेच्या झाडावर २५ ते ३० माकडे अडकून अडकून पडली होती. आधी हा लघुप्रकल्प कोरडा असल्याने चिंचेच्या झाडावर माकडांच्या टोळीचा मुक्काम असायचा. रविवारी पावसामुळे दिवसभर त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. सोमवारी धरणाच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांना झाडांवर माकडांची हालचाल आढळली. अथांग पाणी असल्याने माकडांना झाडावरून इतरत्र जाता येत नव्हते.
तहसीलदार योगेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही माहिती दिली. यावरून जिल्हाधिकारी कार्यालयातून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची चमू पाठवण्यात आली. या चमूसमवेत उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी परतवाडा प्रदीप भड यांच्या मार्गदर्शनात दर्यापूर येथील वनपाल डी.बी. सोळंके, वनरक्षक राजेश धुमाळे, पी.आर. चव्हाण, जे.आर. वालीयाड, आर.बी. पवार यांनी बोटीच्या साहाय्याने झाडावर अडकलेल्या माकडांची टोळीची सुखरूप सुटका केली.