अमरावती : जिल्ह्यात गुरुवारी पाच कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बाधितांच्या मृत्यूची संख्या ६९७ झाली आहे. याशिवाय ३७८ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५१,१०० संक्रमितांची नोंद झालेली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार कामरगाव, वाशीम येथील ७५ वर्षीय पुरुष, वडाळी, अमरावती येथील ७० वर्षीय पुरुष, राहुलनगरातील ६७ वर्षीय पुरुष, धामोरी, भातकुली येथील ६५ वर्षीय महिला व चांदूर बाजार येथील ५२ वर्षीय महिला यांचा गेट लाइफ रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या दोन सदस्यीय केंद्रीय आरोग्य पथक दाखल झालेले आहेत व या पथकाद्वारा आरोग्य यंत्रणेचा आढावा तसेच शहरासह ग्रामीण भागाला भेटी दिल्या जाणार आहे. कंटेनमेंट झोन, लसीकरण केंद्र व नमुने घेण्याचे केंद्रालाही पथकाद्वारा भेटी दिल्या जाणार आहे. त्यानंतर शासनाला अहवाल सादर करणार असल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले.
बॉक्स
कोरोना जिल्हास्थिती
जिल्ह्यात गुरुवारी ४५६ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ४७,५१७ जणांना संक्रमणमुक्त करण्यात आले. ही ९२.९९ टक्केवारी आहे. सद्यस्थितीत २,८८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यात ८७३ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. अन्य रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्याचा डबलिंग रेट १३२ दिवसांवर पोहोचला आहे. डेथ रेट १.३६ वर पोहोचला आहे.