आॅनलाईन लोकमतअमरावती : नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात झाली असून, बुधवारी वसंत हॉल येथील शिबिरात पाचशेवर पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली.पोलिसांची २४ तास आॅनड्युटी असल्यामुळे त्यांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. वर्षभरातील विविध बंदोबस्तात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना सज्ज राहून कर्तव्य बजवावेच लागते. अशाप्रसंगी खानपानावर प्रभाव पडतो. रात्री-अपरात्री जागरण करावे लागते. या अनियमित दिनचर्येमुळे पोलिसांच्या प्रकृतीवर परिणाम होते. गेल्या काही वर्षांत सात ते आठ पोलिसांचे विविध आजारांनी मृत्यू झाले. त्यांच्या मृत्यूस हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब आदी आजार सर्वाधिक कारणीभूत असल्याचे लक्षात आले आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गेल्या वर्षापासून आरोग्य शिबिराचे पाऊल उचलले. वसंत हॉल येथे आयोजित आरोग्य शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय व खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पोलिसांची तपासणी केली. आरोग्य तपासणीनंतर केमीस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे पोलिसांना औषधींचाही पुरवठा करण्यात आला.
पाचशे पोलिसांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 10:15 PM
नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात झाली असून, बुधवारी वसंत हॉल येथील शिबिरात पाचशेवर पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
ठळक मुद्देस्तुत्य उपक्रम : वसंत हॉलमध्ये शिबिर