लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा फैलाव शहरात चांगलाच वाढला आहे. सोमवारच्या अहवालात पाच व्यक्ती संक्रमित आल्यात. यामध्ये चार युवक व एका मुलीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १११ वर पोहोचली आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विषाणू परीक्षण प्रयोगशाळेद्वारा सोमवारी ८३ अहवाल प्राप्त झालेत. यामध्ये पाच व्यक्ती कोरोनाग्रस्त निष्पन्न झाले. यामध्ये मसानगंज येथील संक्रमित व्यक्तीच्या संपकार्तील २२ वर्षीय तरुण तसेच लालखडी येथील १२ वर्षांची मुलगी व २३, ३० आणि ३२ वर्षांचे युवकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.याव्यतिरिक्त जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील २१ वर्षीय तरुणी वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील रुग्णालयात पॉझिटिव्ह निघालेली आहे. ही तरुणी ६ मे रोजी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल होती. या तरुणीच्या संपकार्तील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली
अमरावतीमध्ये आणखी पाच संक्रमित; कोरोनाग्रस्तांची संख्या १११
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 8:50 PM
कोरोनाचा फैलाव शहरात चांगलाच वाढला आहे. सोमवारच्या अहवालात पाच व्यक्ती संक्रमित आल्यात. यामध्ये चार युवक व एका मुलीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १११ वर पोहोचली आहे.
ठळक मुद्देधामणगावातील एक तरुणी वर्धा जिल्ह्यात पॉझिटिव्ह