शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार; सोयाबीन उत्पादकांनाही मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 12:34 PM

सरकारची घोषणा : आखूड धाग्याच्या कापसाला क्विंटलमागे ७,१२१ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाला ७,५२१ भाव देणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकार कापसाला योग्य भाव मिळाला नाही म्हणून हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत देईल, या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, असे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. सोयाबीन उत्पादकांनाही मदत जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले.

भाजपचे हरीश पिंपळे, आदी सदस्यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, यशोमती ठाकूर, किशोर जोरगेवार, राजेश एकडे, आदी सदस्यांनी कापूस उत्पादकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावर्षी कापूस खरेदीला विलंब केला जाणार नाही. दिवाळीपूर्वी खरेदी सुरू करण्यात येईल. आखूड धाग्याच्या कापसाला ७,१२१ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाला ७,५२१ क्विंटलमागे भाव दिला जाईल, असे मंत्री सत्तार म्हणाले, शेतकन्यांना हेक्टरी २० हजार रुपये किमान उत्पादन खर्च येतो, मग पाच हजार रुपये हेक्टरी मदत देऊन काय होणार, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी केला.

पीकनिहाय पेरणी विभाग          हेक्टर                      टक्के तूर                                               ८३३३७६                    ६४मूग                                              १७४२२३                     ४४उडीद                                           २५८३४८                    ७०ज्वारी                                             ५६७२९                    २०बाजरी                                           ३०८२७८                    ४६भुईमूग                                          ९८८०३                      ५२

पेरण्या वाढल्या■ राज्यात सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये लक्षणे वाढ झाली असून राज्यात आतापर्यंत ६८ टक्के अर्थात ९६ लाख हेक्टर होऊन अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.■ खरिपातील महत्त्वाच्या सोयाबीन व कापूस पिकांची देखील पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून सोयाबीनचे क्षेत्र ९१% तर कापूस पिकाखालील क्षेत्र ७६% पेरणी झाली अशी माहिती राज्याचे कृषी संचालक विनय आवटे यांनी दिली. 

राज्यात पाऊस चांगला झाला आहे. पेरणी झालेल्या पिकावर आता खते टाकावीत. आंतर मशागतीची कामे करावीत. - विनय आवटे, कृषी संचालक  

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाcottonकापूसfarmingशेतीAmravatiअमरावती