लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोक अदालतीच्या माध्यमातून कौटुंबिक न्यायालयाने पाच संसार फुलवून कुटुंबियांना दिलासा दिला. रविवारी कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी दहा प्रकरणे निकाली काढण्यात आले.भांडणापेक्षा समझौता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा असा संदेश देऊन कौटुंबिक न्यायालयाने आजपर्यंत अनेक संसार जुळविले आहे. रविवारच्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दहापैकी पाच प्रकरणामध्ये संबधीत पक्षकाराचा संसार जुळविण्यात आला असून, ते एकत्रित संसार थाटण्यासाठी आपआपल्या घरी गेले. घटस्पोट टाळून संबधीत पक्षकारांनी एकत्रीत संसार करण्याचा निर्णय घेतला. उर्वरीत पाच प्रकरणांत आपसी सहमतीने तडजोड केली आहे. या लोकअदालतीत जिल्हा न्यायाधीश (४) व्ही.डी.इंगळे यांनी पॅनल न्यायाधीश म्हणून तर अधिवक्ता लक्ष्मीप्रिया खंडारकर आणि विवाह समुपदेशक दीपाली देशमुख यांनी पॅनल सदस्य म्हणून कामकाज पाहिले.कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश इंद्रकला नंदा यांच्या मार्गदर्शनात लोकअदालन पार पडली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कौटुंबिक न्यायालयातील आस्थापनेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकअदालत यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतल्याची माहिती कोर्ट मॅनेजर डी.एल.क्षीरसागर यांनी दिली.
कौटुंबिक न्यायालयात पाच संसारांचे मनोमिलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:16 PM
लोक अदालतीच्या माध्यमातून कौटुंबिक न्यायालयाने पाच संसार फुलवून कुटुंबियांना दिलासा दिला. रविवारी कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी दहा प्रकरणे निकाली काढण्यात आले.
ठळक मुद्दे१० प्रकरणे निकाली : लोकअदालतमध्ये तडजोड