धामणगाव रेल्वे : तालुक्यातील हिंगणगाव येथील आयएसओ मानांकन मिळालेल्या ग्रामपंचायतीने स्वातंत्र्यदिनी नियमित मालमत्ता करदाते
हरिभाऊ ढाणके यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभिनव उपक्रम राबविला आहे.
हिंगणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच दुर्गाबक्षसिंह ऊर्फ बच्चू ठाकूर व उपसरपंच संगीता धोटे यांनी एक नवीन अभिनव उपक्रम केला. हिंगणगाव येथील गावकऱ्यांची कर वसुलीची यादी बोलावून ज्या लोकांनी आजपर्यंत घर टॅक्स कर कधीच थकीत ठेवलेला नसून, नियमित मालमत्ता कर भरून ग्रामपंचायतीला नेहमी मदतीची भूमिका केलेल्या गावकऱ्यांच्या यादीचे निरीक्षण करण्यात आले.त्यामध्ये हरिभाऊ ढाणके हे एक मोलमजुरी करणारे गृहस्थ. परंतु, नेहमी आपला मालमत्ता कर न चुकवता कराचा भरणा वेळेवर भरून हिंगणगाव ग्रामपंचायतला नियमितपणे मदत करीत होते. त्या दृष्टिकोनाची जाणीव सरपंचांनी स्वतःच्या ध्वजारोहणाचा मान स्वातंत्र्यदिनी गावातील नागरिक हरिभाऊ ढाणके यांना देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले आहे.
गावाच्या उत्कर्षासाठी हिंगणगावचे सरपंच दुर्गाबक्षासिंह ठाकूर, उपसरपंच संगीता धोटे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पातोडे, रुचिता भागवत, विलास चौधरी, उज्ज्वला वानखडे, विलास हेंडवे, नंदा शेंडे, हिरा गाणार, ग्रामसेवक सचिन तसर, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन तितुरमारे, सुधाकर सपाटे, ग्रामरोजगार सेवक अतुल भागवत, संगणक परिचालक माधुरी आदी परिश्रम घेत आहेत.
----------