कर्तृत्ववान महिलांचा सन्मान : एका वर्षात ८४ लाखांचे कर्ज वितरितधामणगाव रेल्वे : एकेकाळी घराच्या बाहेर पाऊल न ठेवणाऱ्या महिला शक्तीने लघु उद्योग व ग्रामीण जिवनोन्नतीने या माध्यमातून यशस्वी पायरी गाठली आहे़८३ बचतगटांनी तब्बल ८४ लाखाचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे़पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मिलींद ठुणुकले, गजभिये व ए़वाय़बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटांनी अनेक लघुउद्योग उभारले आहेत़ तालुक्यात या वर्षात ३७ नवीन बचतगट तयार करण्यात आले तर अनेक वर्ष बंद असलेले २८ बचतगट पुन्हा सुरू करण्यात आले आहे़ २५ गटांना फीरता निधी देण्यात आला आहे़ तर ८३ गटांना ८४ लाख १४ हजार रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे़ तालुक्यातील १०३ बचत गटांच्या महिलांनी घरी शौचायल उभारून आपले गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे़ तळेगाव येथील रमाबाई महिला बचत गट मटन-मांडे या व्यवसायात साता समुद्रापार भरारी घेतली आहे़जयंती महोत्सवानिमित्त पंचायत समितीच्यावतीने कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला़ कमल सुखदेवे, अंजनसिंगी येथील स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक निलेश सराड, के.बी.देशमुख यांचा गौरव सभापती गणेश राजनकर यांचे हस्ते करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)
‘ग्रामीण जीवनोन्नती’ची भरारी
By admin | Published: April 23, 2016 12:10 AM