शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

पूर नियंत्रण कक्ष थेट मंत्रालयातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपशी ‘कनेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 11:34 AM

अतिपर्जन्य, ढगफुटी तसेच धरण फुटण्याबाबतच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप तयार करण्यात आला असून, त्यावर थेट मंत्रालयातील अधिकारी ‘कनेक्ट’ राहणार आहेत.

ठळक मुद्देदर चार तासांनी द्यावे लागणार 'अपडेट' धरणावरील अभियंत्याला राहावे लागणार 'अलर्ट'

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पूर नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अतिपर्जन्य, ढगफुटी तसेच धरण फुटण्याबाबतच्या घटना त्वरित अद्ययावत कराव्या लागणार आहे. माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप तयार करण्यात आला असून, त्यावर थेट मंत्रालयातील अधिकारी ‘कनेक्ट’ राहणार आहेत. त्यामुळे ग्रुपमधील अधिकाऱ्यांना २४ तास अलर्ट राहावे लागणार आहे. त्यासंदर्भाचे परिपत्रक शासनाने यापूर्वीच काढले असून, ते राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना पाठविण्यात आले आहे.राज्यातील जलसंपदा विभागांतर्गत खोरेनिहाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले असून, ग्रुपची निर्मिती ‘पूर नियंत्रण कक्ष’ मंत्रालय यांच्याद्वारे करण्यात आली आहे. त्यात सचिव, कार्यकारी संचालक, संबंधित मुख्य अभियंता व पूर नियंत्रण कक्षातील इन्चार्ज ऑफिसरसुद्धा राहणार आहेत.पूरनियंत्रणाबाबत वेळोवेळी 'अपडेट'धरणातून विसर्ग, पडलेला पाऊस, पूर्ण जलसंचय पातळी व सध्याची पाणीपातळी यासंदर्भाची माहिती दर चार तासांनी सदर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अपडेट करावी लागणार आहे. या युनिटसाठी एक नवीन मोबाइल घेण्याच्या सूचना होत्या. तो २४ तास पूरनियंत्रण कक्षात असेल, जेणेकरून कायमस्वरूपी संपर्कात राहणे शक्य होईल.वायरलेस यंत्रणा सज्जपूरनियंत्रण कक्षातील पाळी (ड्युटी) बदलत असताना मोबाइलवर माहिती 'अपडेट' करूनच ड्युटी संपवावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. नवीन येणाऱ्या अभियंत्यास मोबाइल हस्तांतरित करण्यात यावा. पूरनियंत्रण कक्षात वायरलेस यंत्रणा सतत सज्ज ठेवावी लागणार आहे. सदरच्या मोबाइल ग्रुपवर अतिपर्जन्य, ढगफुटी तसेच धरण फुटण्याबाबत घटना त्वरित 'अपडेट' कराव्या लागणार आहेत. ग्रुप मेंबर्सना त्यांच्याकडील माहिती व मत त्यावर नोंदवावी लागणार आहे.३१ ऑक्टोबरपर्यंत कक्ष कार्यरतपावसाळ्यात महसूल व वनविभागाच्या अधिनस्थ मंत्रालयीन नियंत्रण कक्षात पूर नियंत्रणाच्या संनियंत्रणासाठी जलसंपदा विभागामार्फत १ जून ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूरनियंत्रण कक्षात काम करताना कुठले नियम पाळावेत, यासाठी सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Rainपाऊस