कॅप्शन - पावसामुळे आजूबाजूच्या शेतात असे पाणी पसरले आहे.
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील दाभा आणि धानोरा मंडळात बुधवारी रात्री कोसळलेल्या ११६ मिमी व ९८.८ मिमी पावसामुळे माहुली चोर येथील जळू नदीला पूर वाहिला.
माहुली चोर येथील जळू नदीला पूर आल्याने पाणी आजूबाजूच्या शेतात शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाले. जमीन खरडून गेली. शेतातील सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांचे नदीकाठच्या शेतातील पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे माहुली चोर येथील शेतकरी राजेंद्र सरोदे यांनी सांगितले. बुधवारी रात्री आठ वाजता च्या सुमारास जळू नदीला पूर आल्याने पाणी गावात शिरले होते. सुदैवाने काही वेळात पावसाने उसंत घेतल्याने नदीचा पूर ओसरला. माहुली चोर येथील जळू नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने काही काळ अमरावती यवतमाळ मार्गावरील वाहतूकही खोळंबली होती. असे गावकऱ्यांनी सांगितले.
090921\img-20210909-wa0028.jpg
जळू नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरले.