मोहन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कधामनगाव रेल्वे : सततची नापिकी व कर्ज असल्याने आष्टा येथील शेतकरी राजेंद्र पिसे याने आत्महत्या केली. यामुळे पत्नी व एक मुलगी, दोन मुलाचे आयुष्य उघड्यावर आले. परंतु, संघर्षातून वाट काढत जिद्दीने संघर्षातून शेती जयवंताबाईने शेती करून तालुक्यातील महिलांसाठी आदर्श निर्माण केला.आष्टा येथील जयवंता पिसे शेतात राबून संसाराचा गाडा ओढत आहेत. पती नसला तरी दोन मुले अन् एक मुलगी तिला शेतीच्या कामात मदत करतात. २००७ साली पती राजेंद्र पिसे यांनी ५० हजार रुपयांच्या कर्जापाई आत्महत्या केली. या घटनेने हदरलेल्या तिच्या समोर आपल्या दोन मुलाचे काय हा प्रश्न कायम होता. नियतिशी दोन हात करण्याचा निर्णय घेवून तीने आपला जीवन लढा कायम ठेवण्याची जिद्द ठेवून, घरातील दोन एकर शेती करण्याचा निश्चय केला. कुणाच्याही मदतची वाट न पाहता मुलगा सुमित ललित व मुलगी प्रगती यांनी शिक्षणासह आईला शेतीच्या कामात मदत सुरु केली. पैशाची चणचण भासली की जयवंता दुसºयाच्या शेतात मजुरी करायची. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याचीदेखील ती काळजी घेत होतीच. पतिवियोगाचे दु:ख तर जयवंताला आहेच, मात्र आता रडत बसायचे सोडून कामासाठी पदर खोचला आहे.यंदा जयवंताने आपल्या दोन एकर शेतात सोयाबीन पेरले असून या वर्षीसुद्धा तिला मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, अशी अपेक्षा आहे आणि यात तिला मदत करतात तिचे दोन मुले मुले. शेतीच्या कामात ते सतत तिच्या सोबत असतात. त्यासाठी मुलगीदेखील आपल्या अभ्यासासोबत तिच्या आईला शेतात मदत करते.आज जयवंताबाई उत्तम प्रकारे शेती करीत असून त्या स्वत: सक्षमपणे शेती व्यवसाय साभांळत आहेत. पतीच्या आत्महत्येनंतर त्या खचून न जाता आज स्वत:च शेतात खंबीरपणे निर्णय घेऊन राबत आहेत.
श्रमाच्या पालवीला फुलविली यशाची फुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:45 PM
सततची नापिकी व कर्ज असल्याने आष्टा येथील शेतकरी राजेंद्र पिसे याने आत्महत्या केली.
ठळक मुद्देसंघर्षातून उन्नतीकडे : शेतकरी महिलेची जगण्याची जिद्द