शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

पतंग उडवा, पण जपून नायलॉन मांजा नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:01 PM

प्रतिबंधित नायलॉन मांजाने पतंग उडविणे जीवघेणा ठरू शकते, सोबत संक्रांतीला पतंग जपूनच उडवावी, मांजाच्या स्पर्शाने विद्युत प्रवाहाचा धोका होण्याची शक्यता आहे. यापूर्वी घडलेल्या काही घटनांवरून नाकारता येत आहे.

ठळक मुद्देपशुपक्ष्यांसह मानवी जीवाला धोका : संक्रांतीच्या पर्वावर मांजाची खुलेआम विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रतिबंधित नायलॉन मांजाने पतंग उडविणे जीवघेणा ठरू शकते, सोबत संक्रांतीला पतंग जपूनच उडवावी, मांजाच्या स्पर्शाने विद्युत प्रवाहाचा धोका होण्याची शक्यता आहे. यापूर्वी घडलेल्या काही घटनांवरून नाकारता येत आहे. नॉयलॉन मांज्यात अडकून पशुपक्ष्यांचे जीव गेले, अनेक नागरिकांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे यंदा संक्रांतीच्या पर्वावर नायलॉन मांज्याचा वापर टाळा, असे आवाहन समाजपे्रेमींनी केले आहे. नॉयलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.सुटीच्या दिवसांत अनेक पतंगीचे शौकीन नायलॉन मांज्याचा वापर करून पतंगी आकाशात उडविताना दिसून येतात. याशिवाय संक्रांतीच्या पर्वावर शहरात मोठ्या प्रमाणात पतंगी उडविल्या जातात. १४ जानेवारी रोजी संक्रांतीच्या पर्वावर पतंग उडावा, पण जपूनच, पतंग उडविताना नॉयलॉनच्या मांजा वापर करूच नका, याशिवाय विद्युत तारेपासून दूरच पतंग उडावा, असा सल्ला निसर्गप्रेमींनी दिला आहे. चायना व नॉयलॉन मांज्याचे घातक परिणाम अनेकांना भोगावे लागल्याच्या घटना मागील काही वर्षांत घडल्या आहेत.मागील वर्षांत नवाथे परिसरात नायलॉन मांज्या वाहत्या रस्त्यात आला असता, एका हेल्मेटधारक दुचाकीस्वाराच्या मानेत अडकला होता. त्याच मांज्याने इसमाचा गळा चिरला होता. अनेक पशुपक्ष्यांनाही आपले जीव गमावावे लागलेत. पतंग कटल्यानंतर ती वाºयाच्या दिशेने कुठे जाऊन पडेल याच नेम नसतो, तो धागा बारीक असल्यामुळे सहजासहजी दृष्टीस पडत नाही. त्यामुळे अनभिज्ञ असणाऱ्या नागरिकांच्या गळ्यापर्यंत नॉयलॉन धागा पोहोचल्यानंतरच लक्षात येत. मात्र, तोपर्यंत गळा किंवा अन्य अवयव कापला जातो. अशाप्रसंगी वाहनचालकाचे लक्ष विचलित होत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी शासनाने नॉयलॉन मांज्याच्या उत्पादन, खरेदी- विक्री व वापरावर प्रतिबंध लावला आहे. मात्र, तरीसुद्धा अनेक व्यापारी नॉयलॉन मांज्याचा शहरात छुप्या मार्गाने विक्री करीत असल्याची कुणकुण लागली आहे. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांवर पोलिसांची नजर राहील.मागील वर्षात तीन लाखांचा मांजा जप्तमागल्या वर्षी मनपा, पोलीस प्रशासन, वन विभाग, दिशा फाउंडेशन आणि वसा संस्थाच्यावतीने राजकमल चौकात नायलॉन मांज्या विरोधी स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. या स्वाक्षरी अभियानाला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस विभागाकडून तब्बल ३ लाख रुपयांचा नायलॉन मांज्या बाजारपेठेतून जप्त करण्यात आला होता. अमरावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच नायलॉन मांज्या विरोधातील या कार्यवाहीला प्रथमच एवढा प्रतिसाद मिळाला. यंदाही पोलीस सजग राहून कारवाई करतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.हायटेंशन ताराजवळ पतंग उडविणे जीवघेणेहायटेंशन विद्युत तारेजवळ पतंग उडवू नका, ते जीवघेणा ठरू शकते, असा सल्ला वीज वितरण अभियंत्यांनी दिला आहे. पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा मांजा हा वीजवाहक असू शकतो. मांजा तयार करताना धातूच्या भुकटीचा वापर केला जातो. त्यामुळे धातूमुळे वीज प्रवाहाचा झटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज तारेजवळ पतंग उडवू नका, असे आवाहन वीज वितरण विभागाने केले आहे.प्लास्टिक पन्नीचाही सर्रास वापरप्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर प्रशासनाने अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, आता ती कारवाई थंडबस्त्यात आहे. प्लास्टिकचा वापर पतंगीचा मांजा तयार करण्यासाठीही सर्रास वापर केला जातो.नायलॉन व चायना मांज्याचे घातक परिणाम भोगावे लागतात. शहरात जखमी अथवा नॉयलॉन मांज्यात फसलेल्या पक्षी आढळल्यास आमच्याशी सपर्क साधावा.- शुभम सायंके, निसर्गप्रेमी