ज्या रुग्णांच्या शरीरात गरजेपेक्षा कमी रक्ताची निर्मीती होते, तसेच काहींच्या शरीरात रक्त निर्मितीच होत नाही अशा रुग्णांना रोज औषधी घ्यावी लागते. त्या औषधी सामान्य व्यक्तींच्या अवाक्याबाहेरच्या असल्याने शासनामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालयात दर महिन्याला त्यांना या औषधी, रक्ताच्या पिशवी नि:शुल्करीत्या उपलब्ध केली जाते. त्यामुळे जिल्हाभरातून अशा आजाराच्या रुग्णांसह किशोरवयीन मुले-मुलींना समुपदेशनाअंती गरजेनुसार फोलिक ॲसिडच्या गोळ्या वाटप केल्या जातात. मात्र, गत महिनाभरापासून या गोळ्या उपलब्ध नसल्याने सिकलसेलच्या डॉक्टर सरदार यांनी सीएसच्या मार्गदर्शनात औषधी भांडार अधीक्षक योगेश वाडेकर यांना आवश्यकता असलेल्या औषधींसंदर्भात पत्र दिल्याचे लोकमतला सांगितले.
बॉक्स
प्लेन फोलिक ॲसिड औषधीची कमतरता
नाॅर्मल आणि आयर्नयुक्त फोलिक ॲसिड अशा दोन प्रकारच्या या औषधी असतात. पैकी प्लेन फोलिक ॲसिड या गोळ्या महिनाभरात ३५० रुग्णांना नियिमत द्यावे लागतात. प्रत्येक एक गोळी रोज सेवन करावे लागत असल्याने महिन्याच्या ९० हजार गोळ्यांच्या मागणीकरिता आलेल्या रुग्णांना मार्च महिन्यात या औषधी बाहेरून उपलब्ध करावे लागले. यात गरजूंची सोय मात्र त्यांनी केल्याचे सांगण्यात आले.
कोट
फोलिक ॲसिड ही औषध डे-केअर सेंटरलाच उपयोगी पडत असून, मागणीनुसार पुरवठा केला जात आहे. मात्र, या महिन्यात प्लेन फोलिक ॲसिडच्या गोळ्या उपलब्ध झालेल्या नाही. वरिष्ठांना डिमांड पाठविली जाईल.
योगेश वाडेकर,
अधीक्षक, औषधी भांडारगृह, इर्विन रुग्णालय