इंदल चव्हाण /अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असला तरी संभाव्य तिसºया लाटेची भिती पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक बिनधास्त विनामास्क वावरताना दिसून येत आहे. त्यांना कुणी रोखत नसल्याने नियमांकडे पाठ देण्याचा प्रकार सर्रास होत असल्याने कशी रोखणार तिसरी लाट, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट बरेच काही शिकवून गेली. त्यावर नियंत्रण मिळविण्यात आता महत्प्रयासाने शासनाला यश आले खरे, मात्र पूर्णपणे कोरोना नष्ट झाला नसताना नागरिक विनामास्क बिनधास्त वावरू लागले आहेत. त्यातच अनेका तज्ज्ञांनी आॅक्टोबर महिन्यात कोरोनाचा पसार झपाट्याने होणार असल्याचे भाकित केले असून, तिसरी लाटसुद्धा संभावित असताना कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याने संभाव्य धोका पाहता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनद्वारा यावर मंथन होणे गरजेचे वाटू लागले आहे.
बॉक्स
सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाºया रुग्णांसह नातेवाईकांची सध्या गर्दी वाढली आहे. त्यातच कुणी हनुवटीवर मास्क ठेवून बिनधास्त वावरत आहेत. कुणीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही.
--
रुग्णालयेच ठरू नयेत सुपर स्प्रेड
सध्या वातावरणाची अचानक बदलामुळे व्हायरल फिवरचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रुग्णालयातील ओपीडीची संख्यादेखील वाढीस लागली आहे. त्यात नियमांचे पालन होत नसल्याने रुग्णालयेच तर सुपर स्प्रेड ठरणार नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे.
--
ओपीडी हाऊसफुल्ल
जिल्हा सामान्य रुग्णालयात २४ ते ३० ऑगस्ट या सात दिवसात ६५४९ बाह्यरुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २४ ऑगस्टला १०२९, २५ ला १३३४, २६ ला १००५, २७ ला ९७३, २८ ला ८८३, २९ ला २९०, ३० ला १०३५ रुग्णांचा समावेश आहे.
---
डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले
आरोग्य प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी मिळविले. मात्र, अन्य आजाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे महानगरासह ग्रामीण भागात डेंग्यू आणि मलेरिया व चिकनगुनिया आजाराचे रुग्ण १६४ झाले आहे. अधिक रुग्ण आढळून येत आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये डेंग्यूची भीती निर्माण झालेली आहे.
कोट
रुग्णालयातील सर्व कर्मचारी काळजी घेत आहेत. रुग्णांसह नातेवाईकांना मास्क लावण्यास सुचविले जात आहे. गर्दी टाळण्याकरिता सुरक्षा रक्षक तैनात केले आहे.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक