शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अन्नदात्यासाठी किसानपुत्रांचा अन्नत्याग

By admin | Published: March 20, 2017 12:01 AM

यवतमाळ जिल्ह्यातील चीलगव्हाण येथील साहेबराव करपे दाम्पत्याची आत्महत्या ही राज्यातील पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या ठरली होती.

पंचवटी चौकात आंदोलन : बळीराजाची व्यथा शासनदरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील चीलगव्हाण येथील साहेबराव करपे दाम्पत्याची आत्महत्या ही राज्यातील पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या ठरली होती. १९ मार्च १९८६ मध्ये या घटनेला ३१ वर्षे पूर्ण झालीत. राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृती जपण्यासाठी आणि जगाच्या पोशिंद्याचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी एकदिवसीय ‘अन्नत्याग’ आंदोलन करण्यात आले. पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांच्या पुतळ्यासमोर उभारलेल्या मंडपात एक दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शासनाने शेतकरी कायद्यात सुधारणा करावी करून जगाच्या पोेशिंद्याला न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून शंभर शेतकरी कुटुंबांसह सर्वपक्षीय नेत्यांनी केली. नैसर्गिक आपत्ती, शासनाची शेतकऱ्यांबद्दलची अनास्था यामुळे आतापर्यंत तब्बल लाखभर शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. याशेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवस उपवास करण्यात आला. पहिल्या जाहीर शेतकरी आत्महत्येला तब्बल ३१ वर्षे लोटली. सत्ताापालटही अनेकदा झाला. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या अद्यापही कायम आहेत. शासनाला शेतकऱ्यांची कणव येत नाही. त्यामुळेच पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृती जागवून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. जगाला अन्न पुरविणाऱ्या अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग करण्याच्या किसानपूत्र आंदोलनाचे जनक अमर हबीब यांच्या संकल्पनेतून रविवारी राज्यभर हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. याअन्नत्याग आंदोलनात चंद्रकांत मोहिते, हरिभाऊ मोहोड, नितीन पवित्रकार, विजय विल्हेकर, नितीन गुडधे, प्रकाश साबळे, प्रदीप पाटील, नितीन पवित्रकार, विशाल पवार, आकाश वडतकर, सुधीर हरणे, आशिष टेकाडे, अमोल देशमुख, राहुल इंगळे, नितीन धर्माळे, रोशन घोरमाडे संजय ठाकरे, मयुरा देशमुख, सीमा पाटील, संगीता शिंदे, शेखर भोयर, मयूर खोंडे, पुष्पा बोंडे, प्रदीप राऊत, वसंत लुंगे, ओंकार कोल्हे, रूपेश सवाई, ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसादअमरावती : महेश तराळ, रंजना मामर्डे संजय वानखडे, बंडोपंत भुयार, विठ्ठल वाघ आदी उपस्थित होते. चांदूरबाजारमध्ये १०० शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. यावेळी नंदकुमार बंड, राजाभाऊ देशमुख, पंकज आवारे, विजय कडू, तुषार देशमुख, अंकित देशमुख, रिद्धेश ठाकरे आदी सहभागी झाले होते. शेतकरी चळवळीचे बाबासाहेब लंगोटे यांच्याहस्ते उपवासाची सांगता करण्यात आली. अंजनगाव सुर्जी तालुक्यातही आत्मक्लेश आंदोलन पार पडले. यावेळी राजेंद्र कोकाटे, प्रेमकुमार बोके, शरद कडू, रमेश काळे, प्रदीप निमकाळे, माणिक मोरे, उमेश काकड, सोपान साबळे, विनोद हागोणे, सुभाष खडसे यांच्यासह शेतकरी संघटनेचे माणिकराव मोरे प्रामुख्याने सहभागी झाले होते. इतर तालुक्यांतही आंदोलन यशस्वीरित्या पार पडले. (प्रतिनिधी)जिल्हाभरात शेतकऱ्यांचा आत्मक्लेश किसानपूत्र आंदोलनाचे जनक अमर हबीब यांच्या संकल्पनेतून राज्यभरात करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाला जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या जाहीर शेतकरी आत्महत्येनंतर सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शासनाला जाग कधी येणार, असा सवाल यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केला.