सचिन मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्त्यांची कामे सुरू असल्याने उघड्यावर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांवर प्रचंड धूळ बसत असल्याने तसे खाद्यपदार्थ आरोग्याला घातकच आहेत, असे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदविले.सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दयार्पुरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरातील अतिक्रमण जरी काढले असले तरी ठिकठिकाणी हातगाडीवर विक्री होणाºया खाद्यपदार्थांची दुकाने सुरूच आहेत. शहरातील धूळ त्या खाद्यपदार्थावर बसत असून, नागरिकांच्या खाण्यात येत असल्याने पोटाचे आजार वाढल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. या धुळीच्या वातावरणामुळे नागरिकांना दम्याचा आजार जडला आहे. यासंदर्भात अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.खाद्यपदार्थ विक्रेते बिनधास्तबसस्थानाक चौकात ठेले उभारून खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. याठिकाणी धुळीपासून खाद्यपदार्थांचा कसा बचाव होईल, त्यासाठी विक्रेते कुठलीही उपाययोजना करीत नाहीत.रस्त्यावरील उघडे पदार्थ खाल्ल्याने गॅस्ट्रोची लागण होते. यामध्ये मळमळ होणे, उलटी होते. यामुळे विक्रेत्यांनी खाद्यपदार्थ काचेच्या पेटीत ठेवावे.- डॉ. सचिन नागेउघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाºयांवर कारवाई करावी. शिळे खाद्यपदार्थ पुन्हा तळून विक्री करणाºयावर प्रशासनाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.- अमोल ठाकरे, नागरिक
उघड्यावरील खाद्यपदार्थ घातकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 6:00 AM
सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दयार्पुरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरातील अतिक्रमण जरी काढले असले तरी ठिकठिकाणी हातगाडीवर विक्री होणाºया खाद्यपदार्थांची दुकाने सुरूच आहेत. शहरातील धूळ त्या खाद्यपदार्थावर बसत असून, नागरिकांच्या खाण्यात येत असल्याने पोटाचे आजार वाढल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. या धुळीच्या वातावरणामुळे नागरिकांना दम्याचा आजार जडला आहे.
ठळक मुद्देअन्न प्रशासनाचे दुर्लक्ष : धुळीवर उपाययोजना आवश्यक