शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अन्नपदार्थातील घटकांची होणार विज्ञान केंद्रात तपासणी

By admin | Published: October 14, 2014 11:11 PM

अन्नातील घटकांची तपासणी करणारी कृषी विज्ञान केंद्रावरील देशातील पहिली प्रयोगशाळा दुर्गापूर (बडनेरा) कृषी विज्ञान केंद्रात पूर्णत्वास जात आहे. कृषी मंत्रालयाने याकरिता सुमारे अडीच कोटी

अमरावती : अन्नातील घटकांची तपासणी करणारी कृषी विज्ञान केंद्रावरील देशातील पहिली प्रयोगशाळा दुर्गापूर (बडनेरा) कृषी विज्ञान केंद्रात पूर्णत्वास जात आहे. कृषी मंत्रालयाने याकरिता सुमारे अडीच कोटी रूपयांची तरतूद केल्याची माहिती आहे.शेतमाल, फळे तसेच अन्न पदार्थात असलेली घटकांची तपासणी करण्याची सुविधा सद्यस्थितीत देशातील कोणत्याच कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध नाही. अन्न पदार्थात नेमक्या कोणत्या रासायनिक घटकांचा उपयोग करण्यात आला आहे, त्यावरून त्या पदार्थाचा खाण्यापिण्यासाठी उपयोग करावा किंवा नाही याविषयी निर्णय घेणे शक्य होते. सांडपाण्याच्या पाण्यावर अनेक ठिकाणी भाजीपाला उत्पादित होते. त्या पाण्यातील अतिरिक्त लोह व इतर घटक त्या भाजीपाल्यामध्ये उतरतात. अशा प्रकारचा आहारदेखील आरोग्यावर परिणाम करणारा ठरतो. त्याकरिता अन्न पदार्थाच्या तपासणीला महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेता दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्रद्वारा अन्न पदार्थातील घटकाची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेची मागणी करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने त्यास हिरवी झेंडी दिली असून सुमारे अडीच कोटी रूपयांचा निधीदेखील मंजूर केला आहे. यानुसार प्रयोगशाळेतील आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली असून लवकरच ही प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहे. पाण्यातील विविध घटकांची माहितीदेखील येथून करणे शक्य होणार असून अल्पदरात ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. या सुविधेमुळे शेतकरी, नागरिकांना अन्न पदार्थातील नमूने तपासण्यासाठी याचा महत्वाचा उपयोग करता येणार आहे. (प्रतिनिधी)