लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बी.एस्सी अभ्यासक्रमाचे निकाल ७ जुलै रोजी जाहीर केले. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या चुकांमुळे कागदपत्रांअभावी बहुंताश विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळविण्यासाठी विद्यापीठात पायपीट करावी लागत आहे. सोमवार, ८ जुलैपासून बी.एस्सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणपत्रिकेसाठी झुंबड उडाली आहे.विद्यापीठांतर्गत सर्वच महाविद्यालांनी एम.एस्सी. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १६ ते २३ जुलै ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. विद्यापीठाच्या एम.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीदेखील तारीख निश्चित झाली आहे. अशातच बी.एस्सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच मिळालेल्या नाहीत. विद्यापीठात बी.एस्सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे गठ्ठे तसेच पडून आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यापीठाने गुणपत्रिका त्वरेने संबंधित महाविद्यालयात पाठविणे अनिवार्य आहे. किंबहुना महाविद्यालयाच्या लिपिकांनी गुणपत्रिका तात्काळ नेऊन त्या त्वरेने विद्यार्थ्यांना वाटप करणे आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालये यांच्यातील समन्वयाअभावी विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. बी.एस्सी उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांना नामांकित अथवा पसंतीच्या महाविद्यालयात एम.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल अथवा नाही, याची शाश्वती नसल्याने विद्यार्थ्यांना चिंता सतावू लागली आहे. तातडीने गुणपत्रिका उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.कागदपत्रांची पूर्तता नाहीबी.एस्सी.चे निकाल जाहीर झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाविद्यालयांत गुणपत्रिका पाठविल्या जातात. मात्र, ज्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत, त्यांचेच निकाल 'विथेल्ड'मध्ये आहेत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे कागदपत्रे अपुरे पाठविले आहे. त्यामुळे कागपत्रांची पूर्तता करणाºया विद्यार्थ्यांना लवकर गुणपत्रिका दिली जात असल्याची माहिती परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महाविद्यालयात सर्व कागदपत्रे दिली. मात्र,कोठे गहाळ झाली हे माहिती नाही. बी.एस्सी उत्तीर्ण होऊनही गुणपत्रिका मिळत नाही. निकाल ‘विथेड’मध्ये असल्याचे सांगण्यात आले. विद्यापीठात गुणपत्रिकेसाठी धावाधाव सुरू आहे. एम. एस्सीत प्रवेश कधी घ्यावा, हा प्रश्न आहे.- श्रद्धा राजेंद्र खोकले, विद्यार्थिनी, आर.जी. राठोड महाविद्यालय, मूर्तिजापूरचूक महाविद्यालयाची की विद्यापीठाची, हे आम्हाला माहिती नाही. नाहक विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवणे हा अन्याय आहे. आता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसाठी विद्यापीठाच्या पायºया झिजवाव्या लागत आहे. संबंधितांकडून व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही.- अपेक्षा उंबरकर, विद्यार्थीनीराधाबाई सारडा महाविद्यालयबीए., बी.कॉमचे निकाल के व्हा?बीए., बी.कॉम अंतिम वर्षाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे एम.ए., एम.कॉम. व अन्य पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून विद्यार्थी वंचित तर राहणार नाही, अशी भीती वर्तविली जात आहे. बी.ए. अंतिम वर्षाचे १९ हजार ८६५ विद्यार्थी तर बी,कॉम अंतिम वर्षाे १२ हजार ३४७ विद्यार्थी संख्या आहे. अद्याप पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशलाची सुरुवात झाली नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात आहे.
गुणपत्रिकेसाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 1:28 AM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बी.एस्सी अभ्यासक्रमाचे निकाल ७ जुलै रोजी जाहीर केले. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या चुकांमुळे कागदपत्रांअभावी बहुंताश विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळविण्यासाठी विद्यापीठात पायपीट करावी लागत आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे निकाल रोखले : एम.एस्सी. अभ्यासक्रमास प्रवेश कधी घेणार