शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

चोरीच्या भीतीने दागिणे पोलिसांच्या घरी ठेवले, अन्‌ तेथेही घुसले चोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2022 11:13 PM

चोराने त्या विवाहितेने ठेवलेले दागिने तर चोरलेच, पुढे त्यांनी त्या पोलीस दाम्पत्याच्या घरातून रोकड, सोने देखील लांबविले. चोरच ते, त्यांना काय, ते दागिने कुणाचे, माहेरवाशिणीचे की पोलिसांचे? तब्बल ५.४२ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोराने पोबारा केला. इकडे दाराचे कुलूप तुटलेल्या स्थितीत दिसल्याने चोरीचा प्रकार उघड झाला. ७ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  आपण तर बाहेरगावी चाललोय, घरी चोर शिरले, तर काय करायचे, असा विचार करून एका विवाहितेने तिचे दागिने पोलीस असलेल्या दादा-वहिनींकडे ठेवले. पण हाय रे, तेथेही चोराने एन्ट्री घेतली. चोराने त्या विवाहितेने ठेवलेले दागिने तर चोरलेच, पुढे त्यांनी त्या पोलीस दाम्पत्याच्या घरातून रोकड, सोने देखील लांबविले. चोरच ते, त्यांना काय, ते दागिने कुणाचे, माहेरवाशिणीचे की पोलिसांचे? तब्बल ५.४२ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोराने पोबारा केला. इकडे दाराचे कुलूप तुटलेल्या स्थितीत दिसल्याने चोरीचा प्रकार उघड झाला. ७ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला. घरफोडीची ही घटना महादेवखोरी भागातील राजेंद्रनगर येथे योगेंद्र ओगले यांच्या घरी घडली. योगेंद्र हे मुंबई पोलीस दलात, तर, त्यांची पत्नी तेजस्विनी शहर पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. राजेंद्रनगर येथे तेजस्विनी या सासू वंदना, सासरे देेविदास ओगले व मुलासमवेत राहतात. दरम्यान, योगेंद्र यांचे जावई किरण गडलिंग यांच्या घराचे त्याच परिसरात बांधकाम सुरू आहे. किरण व गौतमी या दाम्पत्याला चांदुरबाजार तालुक्यातील गावी जायचे असल्याने त्यांनी त्यांच्या घरातील सुमारे ३.४२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ओगले दाम्पत्याच्या घरी ठेवले. २३ ऑक्टोबर रोजी गडलिंग दाम्पत्याने ते दागिने वंदना ओगले यांच्याकडे सुपूर्द केले.

अशी घडली घटना  :   ६ नोव्हेंबर रोजी दुपारी एकला ओगले कुटुंब योगेंद्र यांच्या मित्राच्या मुलाच्या नामकरण विधीसाठी अकोला येथे गेले. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे तीनच्यासुमारास ते घरी परतले असता, मुख्य दाराचा कुलूपकोंडा तुटलेला दिसून आला; तर दोन्ही बेडरूममधील आलमाऱ्या उघडया दिसल्या. लॉकर तुटलेले दिसले. अधिक पाहणी केली असता, मुलीकडचे व स्वत:च्या घरातील रोख व सोन्याचे दागिने असा सुमारे ५ लाख ४२ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबाबत तातडीने फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार अनिल कुरळकर व पोलीस निरीक्षक नितीन मगर घटनास्थळी पोहोचले. श्वान व ठसेतज्ज्ञाला पाचारण करण्यात आले. याप्रकरणी वंदना ओगले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. 

काय नेले चोरांनी : चोराने वंदना ओगलेे यांच्या मुलीच्या तीन पोत, कानातले, अंगठी, लॉकेटसह सोन्याचा गोफ असा सुमारे ३.४२ लाख रुपयांचा १०० ग्रॅम सोन्याचा ऐवज लांबविला, तर वंदना ओगले यांचे सोन्याचे कानातले, सोन्याच्या मण्यांची पोत, लॉकेट, डोरले मणी असे २३ ग्रॅम सोने, दोन तोळे चांदी व १.२० लाख रुपये रोख असा २ लाख ५ हजारांचा ऐवज चोरीला गेला.

 

टॅग्स :Thiefचोर