वरुड : कामाला जाते म्हणून घराबाहेर पडलेल्या तालुक्यातील शेंदुरजनाघाट येथील अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी उघड झाली. यासंदर्भात पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलासह तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला. मनोज प्रभाकर बनसोड (२७, रा. मलकापूर) व एक महिला अशी आरोपींची नावे आहेत.
पीडितेच्या पालकांनी आरोपीच्या आईला याबाबत विचारणा केली असता, तुला काय करायचे करून घे, मी माझ्या मुलासोबत तिचे लग्न लावून दिले आणि नागपूरला पाठविले, असे म्हणत घरात निघून गेली. अशा फिर्यादीवरून शेंदुरजनाघाट पोलिसांनी १० फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३६६(अ) ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार श्रीराम गेडाम यांच्या मार्गदर्शनात एपीआय शुभांगी थोरात करीत आहेत.