शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वाघांच्या तृष्णेसाठी वनविभागाची कसरत, आटत आहेत नैसर्गिक पाणवठे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 8:13 PM

यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवायला लागली होती, तर मार्च संपताना ती तीव्र झाली आहे. त्यामुळे जंगलात वाघांसह वन्यजिवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

- गणेश वासनिकअमरावती : यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवायला लागली होती, तर मार्च संपताना ती तीव्र झाली आहे. त्यामुळे जंगलात वाघांसह वन्यजिवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पहिल्यांदाच मार्चमध्येच नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने यावर्षी विदर्भातील वाघांची तृष्णा भागविणे वनविभागासाठी जिकरीचे ठरणार आहे.राज्यातील एकूण सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्य हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात, तर सह्याद्री पश्चिम महाराष्ट्रात आहे. यंदा उन्हाळा अधिक तापणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत. त्यानुसार विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासह पाणी उपलब्ध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. नैसर्गिक पाणवठे पाणी आटू लागल्याने कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती युद्धस्तरावर केली जात आहे. मेळघाट, ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पात पाणीसमस्या गंभीर स्वरूप धारण करणार आहे. परिणामी काही भागात टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजनदेखील करण्यात आले. वाघांची तहान भागविताना निधीची कमतरता पडू नये, याची दक्षता वनाधिकारी घेत आहेत.रान धगधगत आहे. काही जंगलांना आगी लागण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे एप्रिल व मे हे दोन महिने वन्यजिवांचे संरक्षण करताना वनविभागाला कसरत करावी लागणार आहे. जंगलात ५ ते १० कि.मी. अंतरावर कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेत. काही पाणवठ्यांवर सौरऊर्जेवर स्वयंचलित हातपंपाद्वारा पाणीपुरवठा केला जाईल. कृत्रिम पाणवठे तयार करताना प्लास्टिकचे आवरण, माती व पाणी साठवण्याची व्यवस्था राहणार आहे. हल्ली व्याघ्र प्रकल्पात विशिष्ट ठरावीक भागातच नैसर्गिक पाणवठे आहेत. त्यामुळे वन्यजिवांची एका भागातून दुसऱ्या भागात पाण्यासाठी भटकंती होऊ नये यानुसार कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली जात आहे.विषप्रयोगाच्या तपासणीसाठी लिटमस पेपरकृत्रिम पाणवठ्यात विषप्रयोग करून वन्यजिवांची शिकार करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे कृत्रिम पाणवठ्यातील पाणी १२ तासांपेक्षा अधिक काळ साठवून राहता कामा नये. पाणवठ्यात कोणी विषप्रयोग केला असेल, तर ते तपासून पाहण्यासाठी वनकर्मचा-यांना तांबडा लिटमस पेपरचा वापर करण्याच्या सूचना आहेत. पाणवठ्यात विष टाकले असेल, तर लिटमस पेपरचा रंग लाल होतो, या विषप्रयोग तपासणीच्या टिप्स आहेत.वन्यजिवांची पाण्यासाठी भटकंती होणार नाही, ही दक्षता घेतली जात आहे. व्याघ्र प्रकल्प अधिका-यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. यासोबतच शिका-यांवरही लक्ष आहे.- सुनील लिमयेअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर.

टॅग्स :Tigerवाघ