शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

सुंदर, गोड आवाजातला भुलला खंडणीच्या जाळ्यात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 5:00 AM

शहर व ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तशा काही तक्रारी आल्यात. त्या तक्रारींचा सेक्सटॉर्शन होण्यापूर्वीच निपटारा झाल्याने तशा तक्रारीत गुन्हे नोेंदविले गेले नाहीत. अलीकडेच शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनच्या भीतीपोटी एका तरुणाने आकांडतांडव केला होता. त्याचा तो तथाकथित व्हिडीओ डिलिट करण्यासाठी पत्रव्यवहार झाल्याने तो बचावला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फेसबूक, व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉलवरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला, तर तो स्वीकारू नका. व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून दोन्हीकडील व्यक्तींना नग्न असल्याचे भासवून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जात आहेत.  सुंदर, गोड आवाजाला भुलला; खंडणीच्या जाळ्यात अडकला, अशी काहीसी परिस्थिती येऊन ठेपली आहे.शहर व ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तशा काही तक्रारी आल्यात. त्या तक्रारींचा सेक्सटॉर्शन होण्यापूर्वीच निपटारा झाल्याने तशा तक्रारीत गुन्हे नोेंदविले गेले नाहीत. अलीकडेच शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनच्या भीतीपोटी एका तरुणाने आकांडतांडव केला होता. त्याचा तो तथाकथित व्हिडीओ डिलिट करण्यासाठी पत्रव्यवहार झाल्याने तो बचावला.

अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारलेली बरीफेसबूक अकाउंट सुरू करताना यूजर्सना मोबाइलमधील कॅमेरा, काँटॅक्ट, फोटो, माईक अशा अनेक गोष्टींसाठी परवानगी द्यावी लागते. फेसबूकद्वारे केलेल्या चॅटचा डेटाही त्यांच्याकडे असतो. वैयक्तिक माहितीचा सगळा डेटा फेसबुककडे असताना आता त्यात ‘फ्रेंड रिक्वेस्ट मालवेअर’ची भर पडल्याने सावध राहण्याचा इशारा सायबरतज्ज्ञ देत आहेत. अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारलेली बरी, असे सायबरतज्ज्ञ सांगतात. फेसबूक वापरताना फ्रेंड रिक्वेस्ट मालवेअर समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यूजर्सना येणाऱ्या नोटिफिकेशन्सवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कोणतेही ॲप वापरताना फेसबूकद्वारे लॉग इन करणे धोकादायक आहे.

तरूण, वृद्धही अडकलेसोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुंदर ललनांची छायाचित्रे टाकून आकर्षित केले जाते. त्यात तरुणांसह वृद्धदेखील अडकतात. काही महिन्यांपूर्वी नातवंडं असलेले एक वृद्ध अशाच एका सुंदर, गोड आवाजाला भुलले होते. ते लुबाडलेदेखील गेले. मात्र, केवळ बदनामीच्या भीतीपोटी त्यांनी तक्रार नोंदविली नाही.

एक्सटॉर्शन म्हणजे खंडणी आणि लैंगिकतेचा आधार घेऊन किंवा लैंगिक छळ केल्याचा बनाव करून उकळली जाणारी खंडणी म्हणजे ‘सेक्सटॉर्शन’. एखाद्या व्यक्तीचा फोटो अथवा व्हिडिओमध्ये छेडछाड करून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. ‘न्यूड कॉल्स’च्या माध्यमातून सेक्सटाॅर्शन होत आहे.    - डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती

राहा सजग, असे टाळा सेक्सटॉर्शन समाज माध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत जपून मैत्री करा. अनोळखी व्यक्तीचे ‘व्हिडिओ कॉल’ स्वीकारू नका. अनेकदा तरुणांना फसवण्यासाठी आकर्षक तरुणींच्या चेहऱ्याचा वापर होतो. एखादा ‘न्यूड कॉल’ चुकून स्वीकारला, तर अधिक काळ बोलू नका. लैंगिक छळाचा आरोप, बदनामीची भीती दाखवून पैशाची मागणी होते. खंडणी मागितल्यास आर्थिक व्यवहार करू नका.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम