अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नॅक मानांकन घसरले. याला विद्यापीठाचे अधिकारी जबाबदार असून, याप्रकरणी चौकशी समिती गठित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
९ ते ११ ऑगस्ट दरम्यान नॅक पिअर चमूने विद्यापीठाचे मूल्यांकन केले. मात्र, ‘अ’ श्रेणी असलेल्या अमरावती विद्यापीठाला ‘ब’ श्रेणी प्राप्त झाल्याने रिचर्स, शैक्षणिकदृष्ट्या माघारल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. नॅक मूल्यांकनाचा अहवाल येताच
विद्यार्थी हताश झाले आहे. दरमहा लाखोंचे रूपये वेतन घेणारे प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी हितासाठी फेल झाले आहे. आगामी सिनेट सभेत औचित्याचा मुद्दा मांडणार असून याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ते सभेत रेटून धरणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने यावर्षी नॅक समितीला गांभीर्याने घेतलेले नाही. अतिशहापणा अंगलट आला आहे. मात्र, यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप मनीष गवई यांनी केला आहे.