n लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गुणपत्रिकेचे स्वरूप बदलणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी लक्षात घेता आवश्यक ते बदल होणार आहे. गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास असणार आहे. उन्हाळी २०२१ परीक्षेपासून सुधारित गुणपत्रिका मिळणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सन २०१९ मध्ये सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विद्यापीठात गुणपत्रिकेच्या पॅटर्न एकच असावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने गुणपत्रिकेचे स्वरूप बदलविण्यासाठी तयारी चालविली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवर शैक्षणिक बाबी अंतर्भूत असणार आहे. पहिले सत्र ते शेवटच्या सत्रातील विषयनिहाय गुण, टक्केवारीदेखील गुणपत्रिकेवर अंकित असेल. आता दिल्या गुणपत्रिकेवर शिक्षणाविषयी मोजकाच उल्लेख असल्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठात प्रवेशासाठी ही बाब अपुरी पडत असल्याचे विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्धारे मांडली होती. त्याअनुषंगाने गुणपत्रिकेत बदल होणार आहे.उच्च शिक्षण संचालकांच्या बैठकीत निर्णयराज्याचे उच्च शिक्षण संचालक धनरािज माने यांनी सर्वच विद्यापीठाच्या गुणपत्रिकेत बदल करण्याच्या अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी परीक्षा संचालकांसोबत बैठक घेतली होती. यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईनवर सांगोपांग चर्चा झाली. महाविद्यालयीन पदवी, पद्व्युत्तर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचा पॅटर्न एकसमान असण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार येत्या वर्षापासून गुणपत्रिकेत बदल होणार आहे. राज्यात विद्यापीठाच्या गुणपत्रिका समान असाव्यात, असे या बैठकीत ठरविण्यात आले. अकृषी विद्यापीठांना न्यायालयाचे नवे निर्देश लागू करण्यात आले.
सीजीपी गुणपत्रिकेची विदेशात मागणीविदेशात उच्च शिक्षणासाठी अंतिम सत्राचे ग्रेड (सीजीपी) गुणपत्रिका आवश्यक असते. त्याअनुषंगाने गतवर्षी बी.एस्सी.चा एक विद्यार्थी सीजीपी गुणपत्रिकेच्या मागणीसाठी आला होता. मात्र, सीजीपी गुणपत्रिका विद्यापीठात लागू नव्हती. त्यामुळे सदर विद्यार्थी युरोपात उच्च शिक्षणासाठी जाऊ शकला नाही, अशी माहिती परीक्षा संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.