* एसडीओ कार्यालयात सुनवाई बैठक
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, एसडीओ कार्यालयात सुनवाई बैठक
फोटो पी २९ जगताप
चांदूर रेल्वे: समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान वाहनांची ये-जा सुरू असल्याने धुळीमुळे पिकांचे नुकसान झाले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत वारंवार तक्रार अर्ज करूनही समृद्धीचे अधिकारी भरपाईच्या मुद्द्यावर उडवाउडवीची उत्तर देत आहेत. या विषयात शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने सुनवाई बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी माजी आमदार वीरेंद्र जगताप समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतप्त झाले.
नांदगाव तालुक्यातील शिवणी रसुलापूर, खेड पिंपरी, देऊळगाव, वाढोणा रामनाथ या गावांतील ३८ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे वाहतुकीतून उडणाऱ्या धुळीमुळे मुळे प्रचंड नुकसान झाले. स्थानिक तलाठी आणि कृषी सहायक यांनी पंचनामा केला, तर तालुका कृषी अधिकाऱ्याने त्यांचे मूल्यांकन केले. त्यानुसार ३८ शेतकऱ्यांना २२ लाख ६० हजार रुपयांची नुकसानभरपाई समृद्धीकडून मिळू शकते. यादरम्यान बैठकीत समृद्धीच्या अधिकाऱ्यांनी प्रतिनिधी पंचनाम्याला हजर नसल्याचे व आमच्याकडे अधिकार नसल्याचे कारण देत नुकसान भरपाईला नकार दिला. त्यावरून माजी आमदार वीरेंद्र जगताप चांगलेच संतप्त झाले. अधिकार नाही, तर बैठकीला का आले, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावरून अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावर उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी आणि बांधकाम विभागाचे पळसकर यांनी मध्यस्थीची भूमिका निभावत लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून देण्यास बजावले.
अन्यथा आंदोलन
वीरेंद्र जगताप यांनी प्रशासनाला सात दिवसाचा वेळ दिला. सात दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास उपविभागीय कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
===Photopath===
290521\1421-img-20210529-wa0016.jpg
===Caption===
photo