शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

साडेचार लाख रक्त नमुने तपासले, मलेरियाचे ४२ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 1:38 PM

Amravati : मृत्यूसंख्या घटली; मलेरियाच्या नायनाटसाठी यंत्रणा सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जिल्ह्यात २०२३ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ४ लाख ७४ हजार ४२६ रुग्णांचे रक्तनमुने तपासल्यानंतर ४२ रुग्णांचे अहवाल हे हिवताप (मलेरिया) दूषित आढळून आले. २५ एप्रिल या जागतिक हिवताप दिनानिमित्त आरोग्य विभागाच्यावतीने २०१९ ही आकडेवारी देण्यात आली आहे. 'जगाच्या संरक्षणासाठी गतिमान २०२१ करूया लढा मलेरियाला हरविण्यासाठी' असे यावर्षीचे २०२३ ब्रीदवाक्य जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. मलेरियाचा नायनाट करण्यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध उपाययोजनाही राबविण्यात येत आहेत. हिवताप हा प्लाझमोडियम या परजिवीपासून होतो. जगात दरवर्षी ३०० ते ५०० दशलक्ष लोकांना हिवताप होतो. या आजारामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येऊन अंग गार पडणे, सतत ताप येणे किंवा एकदिवसाआड ताप येणे, डोके दुखणे, उलट्या होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. तर मेंदूच्या हिवतापामध्ये तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, मान ताठ होणे, झटके येणे, बेशुद्ध होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे हिवताप टाळण्यासाठी नागरिकांना आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आवाहन सीएस डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी केले आहे. 

 

असा होतो हिवतापाचा प्रसारहिवतापाचा प्रसार अॅनिफिलीस जातीच्या मादी डासामार्फत होतो. या डासाची उत्पत्ती ही स्वच्छ साठून राहिलेल्या पाण्यामध्ये होते. डास हिवताप रुग्णास चावल्यास रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन ते जंतू डासाच्या लाळेवाटे निरोगी मन्युष्याच्या शरीरात जातात.

जिल्ह्यातील सहा वर्षांची आकडेवारीवर्ष                           तपासलेले रक्तनमुने            दुषित रक्तनमुने२०१९                            ४५१७६६                                ३१२०२०                            ४५५१९४                                १३२०२१                            ३१७१६४                                 २८२०२२                            ४००७५७                                ६०२०२३                            ४७४४२६                                ४२

प्रतिबंधात्मक उपाययोजनापाणी साठविण्याचे भांडे घट्ट झाकून ठेवा, आठवड्यातून एकदा सर्व पाणीसाठे आतून घासून- पुसून स्वच्छ ठेवावेत. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या परिसरातील डबकी बुजवा, खिडक्यांना जाळ्या बसवा.

 

टॅग्स :MalariaमलेरियाAmravatiअमरावतीHealthआरोग्य