तळेगाव पोलिसांची कारवाई
तळेगाव दशासर : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांआधी दोन पानटपऱ्या व घरफोडीचे प्रकरण झाले होते. तळेगाव दशासर पोलिसांच्या विशेष पथकाने यवतमाळ येथून चार आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात यश मिळविले आहे.
आरोपी अमीर राजू चौधरी (१९), सावन उत्तम मेश्राम (२१), राहुल सुरेश गुरदे (२१, सर्व रा. यवतमाळ) व शरद एकनाथ उके (३५, रा. वठफळी ह.मु. यवतमाळ) यांना अटक करण्यात आले. पोलिसांनी या सर्व चार आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४६१, ३८० अनवे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक बिरांजे, जमादार संतोष सांगळे, संजय भोपळे, गजेंद्र ठाकरे, श्याम गावंडे, पोलीस शिपाई संदेश चव्हाण, अंकुश पाटील, पवन महाजन, आशिष कांबळे यांनी केली.