लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन, मूग व उडदाची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी सध्या सहा केंद्रांवर शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तंबीनंतर दोन केंद्रांना मंजुरी मिळणार असली तरी जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर केंद्रांना मंजुरीच दिली नसल्याने येथील शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचे कुठे, हा प्रश्न कायमच आहे.जिल्ह्यात शासनाद्वारा सोयाबीनची सहा हजार ९७५ या हमीभावाने ३१ आॅक्टोबरपर्यंत, तर मुगाची सहा हजार ९७५ या हमीभावाने व उडदाची पाच हजार ६०० या हमीभावाने ९ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन नोंदणी करण्याचे आदेश प्रधान कार्यालयाने दिलेत. मात्र, या अवधीत जिल्ह्यात डीएमओंची सातपैकी तीन, तर व्हीसीएमएफची तीन केंद्रच सुरू झालीत.अद्यापही डीएमओची धारणी व चांदूर रेल्वे केंद्र सुरू झालेली नाहीत. अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर या दोन केंद्रांना शासनाने मंजुरी दिलेली नाही. तसेच अमरावती व चांदूरबाजार येथे जे प्रस्ताव दाखल आहेत, त्यामध्ये त्रुटी आढळल्याने ते प्रस्ताव नामंजूर झालेत.शासनाने हमीभाव जाहीर केले. मात्र, या भावानुसार राज्यात खरेदी सुरू नाही. आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रसिद्धी नाही. यासाठी दाखल एका याचिकेच्या सुनावणीच्या अनुषंगाने याविषयीची व्यापक प्रसिद्धी करावी व नाफेडला विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणीची मुदत २४ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मंगेश पितळे यांनी बुधवारी दिल्याची माहिती आहे.धारणी व चांदूर रेल्वे केंद्र सुरू होणारकेवळ दोन शेतकऱ्यांची आॅफलाईन खरेदी केल्यामुळे चांदूर रेल्वे व धारणी येथील खरेदी-विक्री संस्थांना मार्केटिंग फेडरेशनने काळ्या यादीत टाकले होते. याविषयी आ. वीरेंद्र जगताप यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची धमकी दिल्यामुळे हे केंद्र सुरू करण्यास प्रधान कार्यालयाने मान्यता दिली आहे. मात्र, या शेतकºयांच्या चुकाºयाचा प्रश्न कायम आहे.सध्या तीन केंद्रांवर नोंदणी सुरू आहे. धारणी व चांदूर रेल्वे केंद्रांना आता मान्यता दिली. या केंद्रावर लवकरच नोंदणी सुरू होईल, चांदूर बाजार व अमरावती केंद्रांच्या प्रस्तावात त्रुटी आहेत. नांदगाव खंडेश्वर व अंजनगाव सुर्जी केंद्रांना यंदा मान्यता नाही.- राजेश भुयारप्र. जिल्हा विपणन अधिकारी
चार केंद्रांचा वांधा; कशी होणार नोंदणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 10:39 PM
जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन, मूग व उडदाची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी सध्या सहा केंद्रांवर शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तंबीनंतर दोन केंद्रांना मंजुरी मिळणार असली तरी जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर केंद्रांना मंजुरीच दिली नसल्याने येथील शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचे कुठे, हा प्रश्न कायमच आहे.
ठळक मुद्देदोन केंद्रांना मंजुरीच नाही : सोमवारच्या आंदोलनामुळे प्रशासनात लगबग