शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा शेतकरी सचिन वासुदेव खारवे (४६) यांचे १७ फेब्रुवारी रोजी रात्री अमरावती येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू असतानाच प्रभाग क्रमांक ७ येथील वासुदेव मांगीलाल मालवीय (५४) यांचे गुरुवारी पहाटे ७ वाजता निधन झाले. लगोलग भाजपचे कार्यकर्ता सुधाकर पकडे यांच्या बहीण जावयाचे अकस्मात निधन झाले. या सर्वांची चर्चा सुरू असतानाच डाबर मोहल्यातील आणखी एका इसमाच्या मृत्यूची वार्ता धडकली आणि पाहता पाहता परिसरात मृत्यूच्या घटनेने शहराला हादरून टाकले. शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांत वाढ होत असताना चारही मृत्यू कोरोनाव्यतिरिक्त आजाराने वा नैसर्गिक झाले असले तरी लोकांच्या मनात कोरोनाविषयी धास्ती असल्याने त्या कोरोना डेथ तर नसतील ना? अशी भीती अनेकांच्या मनात घर करून गेली.
एकाच दिवशी चार मृत्यूने धारणी हळहळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:35 AM