शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

पालकमंत्र्यांच्या निवासी क्षेत्रात चार घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:34 PM

राज्याचे सार्वजनिक बांधकाम, उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे निवासस्थान असलेल्या राठीनगर परिसराला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्यांच्या टोळीने लक्ष्य केले आहे.

ठळक मुद्दे राठीनगर परिसराला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्यांच्या टोळीने लक्ष्य केले आहे.

अमरावतीकर असुरक्षितलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याचे सार्वजनिक बांधकाम, उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे निवासस्थान असलेल्या राठीनगर परिसराला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्यांच्या टोळीने लक्ष्य केले आहे. येथून साडेसात लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. जिल्ह्याचे पालकत्व असलेल्या मंत्र्यांचाच परिसर सुरक्षित नसेल, तर सामान्य अमरावतीकरांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शनिवारी पहाटे उघड झालेल्या चार घरफोड्यांच्या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी स्वतंत्र फिर्याद दाखल करून तपास सुरू केला. उच्चभ्रू वस्तीत गणल्या जाणाºया राठीनगर परिसरात पालकमंत्री पोटे यांचे निवासस्थान असल्याने या संपूर्ण परिसराला कडेकोट सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. येथे गाडगेनगर पोलिसांसह खुपियांची नियमित रात्रकालीन गस्त असते. मात्र, या सुरक्षेला वाकुल्या दाखवत आणि थेट पालकमंत्र्यांना आव्हान देत चोरट्यांनी शुक्रवारी राठीनगरचे ‘टार्गेट’ यशस्वी केले. येथील रहिवासी सुधीर धनराज बारबुद्धे, ललित भीमराव जावरकर, अरुणा पोतदार व दिलीप बोंडे यांची घरे चोरट्यांनी फोडली.संगणक व्यवसायातील सुधीर बारबुद्धे, पत्नी अर्चना व १२ वर्षीय मुलगा अमन बेडरूममध्ये झोपले होते. हॉलमधील खिडकीच्या ग्रिलचे नटबोल्ट काढून चोरांनी बारबुद्धेंच्या घरात प्रवेश केला आणि आलमारीचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचा ऐवज व २० हजारांची रोख असा तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. विशेष म्हणजे, चोरट्यांनी बेडखालील बॅग व्हरांड्यात आणली तेव्हा या कुटुंबाला कसलीही चाहूल लागली नाही. सुधीर बारबुद्धे पहाटे ४.३० वाजता झोपेतून उठल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. गाडगेनगर पोलिसांकडून पंचनामा सुरू असतानाच शेजारच्या ललित जावरकर यांनीही घरात चोरी झाल्याची तक्रार नोंदवली. चोरट्यांनी बेडरूमचे ग्रील काढून घरातून सोन्या-चांदीचा व रोख असा एकूण ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेले. यादरम्यान शेजारी राहणारे अरुणा पोतदार व दिलीप बोंडे यांचेही घरात चोरी झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोतदार हे मुंबई, तर बोंडेचे कुटुंबीय हे बंगलोरला राहतात. त्यामुळे येथून किती मुद्देमाल चोरीस गेला, ही बाब स्पष्ट शकली नाही. पोलिसांचे श्वानपथक काही अंतरावर जाऊन घुटमळले.शुक्रवारी तीन घरफोड्या उघडराठीनगरातील घरफोड्यांपूर्वी शहरात गुरुवारी रात्री तीन घरफोड्या उघड झाल्या. खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील पुष्पक कॉलनीत राहणारे कैलास गयाप्रसाद श्रीवास यांचे कुटुंबीय बाहेर गेले होते. चोरांनी दाराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचा व रोख असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. राजापेठ हद्दीतील पोलीस कॉलनी राहणारे नारायण मारुती आखरे हे यवतमाळ गेले होते. चोरांनी येथून १० हजारांचा ऐवज लंपास केला. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्री यादगीरे येथे प्रदीप भागवत गोळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरांनी ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित कैदराठीनगरातील रहिवासी सुधीर बारबुद्धे यांच्या घराजवळच माजी महापौर किरण महल्ले राहतात. त्यांच्या घरावर लागलेल्या सीसीटीव्हीत मध्यरात्रीच्या सुमारास फिरत असलेले दोन संशयित कैद झालेत. त्यांच्या वर्णनावरून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या दोन्ही संशयित इसमांच्या कुटुंबातील महिलांनी पोलीस आयुक्तालय गाठून गोंधळ घातला होता.दागिन्यांची किंमत दाखविली जाते कमीघरफोडी किंवा चोरीच्या घटनांमध्ये चोरी गेलेल्या सोन्या-चांदीचे दर पोलिसांकडून कमी दाखविले जातात. राठीनगरात घडलेल्या चोरीमध्येही पोलिसांनी साडेचार लाखांपर्यंत सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाल्याचे नमूद केले आहे. मात्र, हा मुद्देमाल आजच्या दरानुसार सात ते आठ लाखांच्या घरात आहे. पोलिसांनी नमूद तक्रारीत दागिन्यांचे दर कमी दाखविल्याने तक्रारकर्तेही संभ्रमात पडले आहेत.गुंगीचा स्पे्र वापरल्याची शक्यताबारबुद्धे कुटुंबीय घरात असतानाच चोरट्यांची बेडरूमपर्यंत मजल गेली. त्यांचा मुलगा शनिवारी सकाळी उशिराच उठला. हा गुंगीच्या स्प्रेचा प्रभाव असावा, असा संशय बारबुद्धे कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.एका घरावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन इसम आढळले. यावरून दोन संशयितांची चौकशी सुरू आहे. अशा पद्धतीचे गुन्हे करणाºया रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.- चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त