लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने २ ते ८ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील १२ केंद्रांद्वारे तुरीची नोंदणी हमीभावाने सुरू केली अन् १८ एप्रिल रोजी खरेदी व आॅनलाइन बंद केली. अद्याप ४२,७४० शेतकऱ्यांची किमान चार लाख क्विंटल तूर घरी पडून असल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याचा आरोप होत आहे.जिल्हा तूर उत्पादकतेच्या एकूण २५ टक्के प्रमाणातच १८ एप्रिलपर्यंत तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश पणनच्या सरव्यवस्थापकांनी सर्व डीएमओ व व्हीसीएमएफच्या अधिकाºयांना दिलेत. यामुळे सद्यस्थितीत ६८,६२९ शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी, प्रत्यक्षात २५,८८९ शेतकºयांची ४.०६ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचे वास्तव आहे.यंदाच्या हंगामात साधारणपणे एक लाख १० हजार क्विंटल तुरीचे क्षेत्र होते व कृषी विभागाने हेक्टरी सरासरी उत्पादकता १३.५० क्विंटल जाहीर केली त्यानुसार जिल्ह्यात यंदा १४.८५ लाख क्विंटल तूरीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापैकी सहा लाख क्विंटल तूर नाफेडच्या दिरंगाईमुळे खासगी बाजारात विकल्या गेली असली तरी अद्याप शेतकºयांच्या घरी किमान चार लाख क्विंटल तूर पडून आहे. अशा परिस्थितीत शासनाने तूर खरेदी व नोंदणी बंद केली आहे. त्यामुळे खासगी बाजारात तूर विकण्या शिवाय पर्याय नसल्यामुळे शेतकºयांची लूट अटळ आहे.
४३ हजार शेतकऱ्यांची चार लाख क्विंटल तूर घरी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:11 AM
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने २ ते ८ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील १२ केंद्रांद्वारे तुरीची नोंदणी हमीभावाने सुरू केली अन् १८ एप्रिल रोजी खरेदी व आॅनलाइन बंद केली. अद्याप ४२,७४० शेतकऱ्यांची किमान चार लाख क्विंटल तूर घरी पडून असल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याचा आरोप होत आहे.जिल्हा तूर उत्पादकतेच्या एकूण २५ ...
ठळक मुद्देआॅनलाईन नोदणी, खरेदी बंद : खासगी बाजारात लूट, मुदवाढीची प्रतीक्षा