अमरावती : तीन वेळा टेंडर रिकॉल झाल्यानंतर अखेर चौथ्यांदा या कामाला कंत्राटदार मिळाला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ५६ कोटींच्या निधीतून आता पंचवटी चौक ते राजपूत धाबा (रिंगरोड) पर्यंत चाडेचार किमीच्या रस्त्याचे कॉक्रिटिकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.
५६ कोटींचे काम हे गत दीड ते दोन वर्षापासून मंजूर होते. मात्र, निविदा प्रक्रियेत काही तांत्रिक त्रुटी आढळून येत होत्या. त्या सदर तीन वेळा सदर टेंडर रिकॉल करण्यात आले. त्यानंतर आता सदर काम हे जे. पी. एन्टरप्राईजेस मुंबई या कंपनीला मिळाले आहे. पंचवटी ते राजपूत ढाब्यापर्यंत चारपदरी काँक्रीटकरणाचा रस्ता, दोन्ही बाजूला सिमेंट नाल्या, तसेच नाली ते सिमेंट रस्त्याच्या मधात पेव्हिंग ब्लॉक, असे ते काम राहणार आहे. या कामाचा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कंपनीच्या इंजिनिअर यांनी कामाचा सर्वे पूर्ण केला असून, डिझाईन तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पावसाळ्यामुळे कामात विलंब लागत असून पावसाळ्यानंतर सदर कामांना सुरुवात होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कोट
संबंधित अधिकाऱ्याचा कोट आहे.