लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एम्सद्वारा सोमवारी रात्री उशिरा चार जणांचा थ्रोट स्वँब अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. यामध्ये एका दिग्गज राजकीय नेत्याचे नाव असल्याने शहराला हादरा बसला आहे. सोमवारी एकूण १० पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६५ वर पोहोचली आहे. सोमवारी रात्री १२ वाजता प्राप्त अहवालानुसार येथील कॉटन मार्केट परिसरात राहणारी एक व्यक्ती, खोलापरी गेट परिसरात एक व अमरावती तालुक्यातील शिराळा येथील दोन व्यक्तीच्या घश्यातील स्त्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सोमवारी दिवसभरात बडनेरा नवी वस्तीतील कुरेशी नगरात एक, खोलापुरी गेट येथे दोन (यामध्ये एक महिला ) क्लस्टर हॉटस्पॉटलगतच्या हबीबनगर येथे एक, हनुमाननगर येथे दोन व कॉटन मार्केट परिसरात एक व जिल्हा ग्रामीणमध्ये शिराळा येथे तीन अशा दहा व्यक्तींचा समावेश आहे. या बाधितांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येवून या भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली व सकाळपासून आशा व एएनए पथकाचा सर्वे सुरु आहे. महापालिका आयुक्तांव्दारा रात्री हबीबनगर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले. मंगळवारी पुन्हा दोन झोन जाहीर करण्यात येणार आहे. सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या या नेत्याच्या संपकार्तील व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रीया गतिमान झाली आहे. अमरावती जिल्ह्यात ६५ बाधितांमध्ये १० मृत, ५ कोरोनामुक्त व ५० व्यक्तिंवर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अमरावतीमध्ये आणखी चार पॉझिटिव्ह; बाधितांमध्ये एका दिग्गज राजकीय नेत्याचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 9:28 AM
एम्सद्वारा सोमवारी रात्री उशिरा चार जणांचा थ्रोट स्वँब अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. यामध्ये एका दिग्गज राजकीय नेत्याचे नाव असल्याने अमरावती शहराला हादरा बसला आहे.
ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांची संख्या ६५