लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सायन्स्कोर मैदानात बस्तान मांडून बसलेल्या जडीबुटी विक्रेत्यांकडून वनविभागाने मंगळवारी चार पोपटांची सुटका केली. कार्स संघटनेचे विजू खोट्टे यांच्या माहितीवरून रेस्क्यू पथकाने ही कारवाई केली.सायन्स्कोर मैदानात अनेक जडीबुडी विक्रेते अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांच्याकडे पोपट असल्याची माहिती विजु खोट्टे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांना दिल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर, वनपाल सतीश इंगळे, अमोल गावनेर, सतीश उमक, किशोर खडसे, मनोज ठाकूर, अभी व्यवहारे यांनी जडीबुटी विक्रेत्यांची तपासणी केली. दरम्यान, त्यांना एका जडीबुडी विक्रेत्याजवळ करण प्रजातीचा पोपट व दुसºया विक्रेत्यांजवळ तीन पोपट आढळून आले. वनकर्मचाºयांनी पोपट ताब्यात घेऊन कार्यालयात आणले. जडीबुडी विक्री करणाºया महिलांनी कार्यालय गाठून पोपट परत करण्याची मागणी रेटून धरली. वनकर्मचाºयांनी समजूत घालून त्यांना परत पाठविले. वनविभागाने जडीबुडी विक्रेत्यावर कारवाई केली नाही. मात्र, चार पोपटांची सुटका केली आहे.पोपट पिजºयांत ठेवल्यास २५ हजारांचा दंडवन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये पोपटाला पिंजºयात ठेवणे गुन्हा आहे. पाळलेला पोपट पिंजºयातून मुक्त करा किंवा २५ हजारांचा दंड भरण्याची तयारी ठेवा, असे फर्मान वनविभागाकडून जारी होणार आहे. शेड्यूल ३ व ४ मधील असणारा पोपट हा वन्यजीव कोणाच्याही घरी पिंजºयात जेरबंद असेल, तर त्याला वनविभागाच्या स्वाधीन करा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
वनविभागाने केली चार पोपटांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:17 PM
सायन्स्कोर मैदानात बस्तान मांडून बसलेल्या जडीबुटी विक्रेत्यांकडून वनविभागाने मंगळवारी चार पोपटांची सुटका केली.
ठळक मुद्देसायन्सकोर मैदानातील घटना : कार्स संघटनेचा पुढाकार