जितेंद्र दखणे
धामणगाव रेल्वे (अमरावती) : यवतमाळहून धामणगावकडे येत असताना देवगाव चौफुलीजवळ कारचे टायर फुटल्याने चौघे गंभीर जखमी झाले. या चौघांनाही यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.
चालक दयानंद रमेश इंगळे (५५), तारामती इंगळे (७०), रणजित सुभाष सावळे (२७, तिघे रा. मांडवा, ता. मेहकर, जि. बुलढाणा) व चेतन विक्रम अंधारे (४२, रा. यवतमाळ) अशी जखमींची नावे आहेत.