लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अधिकाऱ्यांना सामाजिक भान असले की, त्यांच्याकडून काही तरी उदात्त घडते, याचे उदाहरण महापालिकेची स्पर्धा परीक्षा अभ्याासिका आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी २४ तास सुरू राहणारे शहरातील या पहिल्या अभ्यास केंद्राची संकल्पना उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी प्रत्यक्षात आणली. या केंद्रातून तयारी करणारे चार विद्यार्थी पीएसआय झाले आहेत. शुक्रवारी जाहीर झालेल्या एमपीएससी यादीत त्यांचे नाव झळकले.अभ्यासिकेतून आजघडीला २०० हून अधिक युवक उच्चपदस्थ झाले आहेत. एरवी महापालिका म्हटले की, मुद्द्या-गुद्द्याचे राजकारण, लहान-सहान गोष्टींवरून वाद व पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपात ढासळलेले प्रशासन याचीच चर्चा जास्त होते.राज्यातला दुसरा नाविन्यपूर्ण प्रयोगयापलीकडेही काही बाबी दुर्लक्षित असतात आणि असे दुर्लक्षित असणे त्यांच्यासाठी चांगले असते. महापालिकाद्वारे शहरातील सामान्य वर्गातील मुलांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीची अभ्यासिका त्यातील एक आहे. दुर्लक्षित व शिकस्त झालेली आयुक्तांच्या बंगल्यालगतची शाळा, तसे पाहता अत्यंत मोक्याच्या जागी असल्याने त्यावर सर्वांचाच डोळा. मात्र तेथे उपायुक्त वानखडे यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यांसाठी शहरातली पहिली अभ्यासिका सुरू केली. यासाठी सुरूवातीच्या काळात अनेक अडचणी आल्यात. विद्यार्थ्यांचा सहभाग नव्हता. पुस्तके, साहित्य पुरेशी नव्हती, हे सर्व त्यांनी लोकसहभागातून उभे केले. मग हळूहळू शहरातील विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेची आवड होऊ लागली. आज या केंद्रात अडीच हजार विद्यार्थी प्रवेशासाठी वेटींगवर आहेत. चार हजारांवर ग्रंथसंपदा याठिकाणी आहेत. अमरावती विद्यापीठाचे चार कुलगुरू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांना मनोबल उंचावणारे धडे दिलेले आहे. आजच्या घडीला शहरात अशा प्रकारच्या सहा ते सात अभ्यासिका सुरू झाल्यात. मात्र, या केंद्रात प्रवेशोत्सुकांची संख्या पाहता सर्वसामान्य युवकाचा कल याच अभ्यासिकेकडे असल्याचे दिसून येते.चाळणी परीक्षेद्वारे प्रवेशप्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी इच्छुक असल्याने या केंद्रात आता चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश देण्यात येतो. सद्यस्थितीत या अभ्यासिकेतून २०० वर विद्यार्थी शासकीय सेवेत विविध पदांवर दाखल झाले आहेत. शुक्रवारी एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये या अभ्यासिकेचे वैशाली सोळंके (रँक ९), अंकुश वडतकर (१८५), सुनीता उमीनवाडे (२), हरिषचंद्र जाधव (१९५) व शुभम महल्ले यांची सैन्यदलात अधिकारी म्हणून निवड झालेली आहे.राज्यात दुसरा नावीन्यपूर्ण असा हा दुसरा उपक्रम आहे. सर्वसामान्य परिवारातील ५०० वर तरूण या ठिकाणी रोज अभ्यास करतात. शासनाच्या विविध खात्यांत सद्यस्थितीत २०० वर अधिकारी या अभ्यासिकेतून दाखल झाले आहेत. याचा सार्थ अभिमान आहे.नरेंद्र वानखडे, उपायुक्त, महापालिका५०० आसनक्षमता, विद्यार्थ्यांसाठी २४ तास खुलेअभ्यासिकेची ५०० आसनक्षमता आहे. केंद्र विद्यार्थ्यांसाठी २४ तास उघडे राहते. नाममात्र ५० रुपये शुल्कात स्पर्धा परीक्षेशी संबंधित चार हजारांवर पुस्तके, परीक्षा व अर्ज भरण्यासाठी विनामूल्य इंटरनेट, चर्चा व मार्गदर्शनासाठी साऊंड सिस्टीम, प्रोजेक्टर, आरओचे शुद्ध पाणी या सुविधा उपलब्ध आहेत.
मनपाच्या अभ्यासिकेतून चार विद्यार्थी पीएसआय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 10:44 PM
अधिकाऱ्यांना सामाजिक भान असले की, त्यांच्याकडून काही तरी उदात्त घडते, याचे उदाहरण महापालिकेची स्पर्धा परीक्षा अभ्याासिका आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी २४ तास सुरू राहणारे शहरातील या पहिल्या अभ्यास केंद्राची संकल्पना उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी प्रत्यक्षात आणली. या केंद्रातून तयारी करणारे चार विद्यार्थी पीएसआय झाले आहेत. शुक्रवारी जाहीर झालेल्या एमपीएससी यादीत त्यांचे नाव झळकले.
ठळक मुद्देसर्वसामान्यांसाठी उपलब्धी : चार हजार ग्रंथसंपदा, २०० वर विद्यार्थी उच्चपदस्थ