शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

स्वित्झर्लंडमध्ये चार संशोधक युवतींनी फडकवला तिरंगा, दोघी अमरावतीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2022 10:55 AM

‘जिनिव्हा चॅलेंज’ या जागतिक, सामाजिक आव्हान परिषदेमध्ये भारताच्या चार संशोधक युवतींनी जागतिक क्रमवारीत द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे या चौघींपैकी दोघी अमरावतीच्या आहेत.

ठळक मुद्दे‘भारतीय सार्वजनिक आरोग्य आणि धोरण’ प्रकल्पाला द्वितीय क्रमांक

अमरावती : स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा स्थित ‘ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट’मध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘जिनिव्हा चॅलेंज’ या जागतिक, सामाजिक आव्हान परिषदेमध्ये भारताच्या चार संशोधक युवतींनी जागतिक क्रमवारीत द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे या चौघींपैकी दोघी अमरावतीच्या आहेत. ही परिषद स्विस राजदूत जेनो स्टेहेलीन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

सामाजिक समावेशन आणि समाजात उद्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्या’ यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर विकास समस्यांवर सैद्धांतिक आणि व्यावहारिक निराकरणासाठी सखोल संशोधन करणाऱ्या विद्वान पदव्युत्तर नवसंशोधकांसाठी ‘जिनिव्हा चॅलेंज’ हा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संशोधन मंच आहे. ‘भारतीय सार्वजनिक आरोग्य आणि धोरण’ या विषयावर मीनल मदनकर, डॉ. पूजा सावळे, डॉ. अनुकृती छाबरा आणि डॉ. हर्षल शिरोडकर या चार भारतीय संशोधक युवतींच्या संघाने प्रकल्प सादर केले.

आशिया खंडातून झाली निवड

जिनेव्हा चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून एकूण ३६६ संघांची नोंदणी करण्यात आली. जगभरातून एकूण ५५८ आरोग्य विद्वानांनी १४५ प्रकल्प सादर केले. त्यापैकी शैक्षणिक सुकाणू समितीने १६ उपांत्य फेरीतील संघ निवडले. त्यामधून भारतीय संशोधक संघाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, आशिया खंडातून एकमेव भारताचे हे चार प्रतिनिधी परिषदेला आमंत्रित होते.

अरण्य फाउंडेशनच्या संस्थापक

मीनल मदनकर आणि डॉ. पूजा सावळे या अमरावती स्थित अरण्य फाउंडेशनच्या संस्थापक कार्यकारी सदस्य आहेत. ही सामाजिक संस्था देशातील १७ आणि विदेशतील ६ अशा एकूण २३ शीर्ष विद्यापीठातील १६० हून अधिक संशोधक आणि प्राध्यापकांनी बनवलेली सेवाभावी संस्था असून संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्दिष्टे या विषयांतर्गत भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागातील समकालीन सामाजिक समस्यांवर संशोधन करते.

टॅग्स :scienceविज्ञानSocialसामाजिक