अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर आरक्षण सोडतीची प्रक्रिया आटोपताच जिल्हाभरात ११ फेब्रुवारी पासून सरपंच, उपसरपंचपदासाठीची निवडणूक प्रक्रियेचा चौथ्या टप्प्यात १६ फेब्रुवारी रोजी १४ पैकी १२ तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक पार पडणार आहेत.
जिल्ह्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या जिल्हाभरातील ५५३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवडयात काढण्यात आले आहे.त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नव्याने अतित्वात येत असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवड प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यानुसार आता निवडणूक प्रक्रियेचा १६ फेब्रुवारीच्या चौथ्या टप्यात १०१ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच पदासाठीच्या निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत.त्यामुळे गावोगावी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
बॉक्स
११ तालुक्यात विशेष सभा
सरपंच व उपसरपंच पदासाठीची निवडणूकीची प्रक्रिया १६ फेब्रुवारी रोजी १४ तालुक्यापैकी मंगळवारी १०१ ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभा आयोजित केली जाणार आहेत.यामध्ये ग्रामपंचायतींच्या नव्या शिल्लेदारांची निवड केली जाणार आहे.