अमरावती : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशाची चौथी फेरी शुक्रवारपासून प्रारंभ झाली आहे. २० सप्टेंबरपर्यंत ही फेरी राहील. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. प्रवेशासाठी जागा पुरेशा असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, अशी माहिती अकरावी प्रवेश प्रक्रियेचे समन्वयक अरविंद मंगळे यांनी दिली. आतापर्यंत ७०१९ विद्यार्थ्यानी प्रवेश मिळविले असून, ८९७१ जागा रिक्त असल्याची माहिती आहे.
--------------------------
अशी आहे अकरावी प्रवेशाची स्थिती
शाखा झालेले प्रवेश रिक्त जागा
कला १४२५ २०३५
वाणिज्य १०९३ १५६७
विज्ञान ४०७२ २८६८
एमसीव्हीसी ४२९ २५०१